Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या इमारतीला आग, 135 नागरिकांची सुटका

मुंबई: मुंबईतील बहुमजली इमारतीत शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या 3 स

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेकापचे अर्धनग्न आंदोलन
कृष्णा अभिमत विद्यापीठाचा आज 10 वा दीक्षांत सोहळा; 1227 विद्यार्थी होणार पदवीने सन्मानीत
पठाण फिल्मच्या निर्माते, दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची भूमिका मांडावी – राम कदम 

मुंबई: मुंबईतील बहुमजली इमारतीत शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोडपदेव विभागातील म्हाडा संकुलातील न्यु हिंद मिल कपाऊंडच्या 3 सी या 24 मजली इमारतीला आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील 135 नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. तसंच, अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी 7.20 मिनिटांनी आग अटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या इमारतीला पहाटे 3.40 मिनिटांनी तिसर्‍या मजलावर आग लागली. या इमारतीत मिल कामगार आणि संक्रमण शिबिरातील रहिवासी राहतात.  मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, एक ते चोवीस मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली. तसेच, 135 जणांपैकी 25 जणांना इमारतीच्या टेरेसवरून, 30 जणांना 15 व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि 80 जणांना 22व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, तीन पाण्याचे टँकर आणि अग्निशमन दलाच्या इतर गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. 3.40 मिनिटांनी लागलेली आग सकाळी 7.20 वाजता विझवण्यात आली. अनेक नागरिक अद्यापही भयभीत आहेत. लिफ्ट बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिकांना बाहेर काढण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यांच्यासाठी रुग्णवाहिकाही तातडीने बोलवाव्या लागल्या. म्हाडासारख्या इमारतीत आगी लागल्या तर सामान्य नागरिकांनी सुरक्षित कसं राहायचं? असा प्रश्‍न इमारतीतील रहिवासी देवेंद्र कांबळी यांनी उपस्थित केला आहे.

COMMENTS