Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायरेश्‍वर मंदिरात ‘आप’ ने घेतली सुराज्याची शपथ

पुणे ःआगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्ष (आप) पुणे शहर सुराज्याची आखणी करत आहे. आपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रायरेश्‍वरावर येथील शंकरा

शिवसेना संपर्कप्रमुखावर शिवसैनिकांकडून जीवघेणा हल्ला | LokNews24
मुंबईतील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध
दुर्देवी ! मुलीला स्थळ पाहण्यासाठी निघालेल्या आईचा अपघातात मृत्यू l LOK News 24

पुणे ःआगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आम आदमी पक्ष (आप) पुणे शहर सुराज्याची आखणी करत आहे. आपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रायरेश्‍वरावर येथील शंकराच्या मंदिरात जाऊन सुराज्याची शपथ घेतली. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या राज्यपालांच्या आक्षेपार्ह विधानावर आणि लोकांनी व सर्व पक्षांनी एकत्र येऊन राज्यपालांच्या राजीनाम्यासाठी काढलेल्या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर, आम आदमी पक्ष ही शपथ घेऊन महाराष्ट्राचे महाराजांवरचे प्रेम अधोरेखित केले आहे, असे आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितले. कुंभार म्हणाले की, आम आदमी पक्ष महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात जनकल्याणाच्या विविध योजना, सेवा सुविधा लोकांपर्यंत पोहोचवून, लोकांचे विविध प्रश्‍न सोडवून त्याला सुराज्य करण्याचा प्रयत्न करणार आहे.
पुणे शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली असतांना, पुण्यात देखील आम आदमी पक्षाकडून महानगरपालिका लढवण्याची तयारी केल्याचे एकंदरित चित्र आहे. पुणे महानगरपालिकेकडे सर्वाधिक निधी असतांना देखील नागरिकांना नागरी सुविधा पुरेशा प्रमाणत मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आपने सुराज्याची शपथ घेत वेगळी वाट चोखाळण्याचे संकेत दिले आहेत.

COMMENTS