Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोणावळ्यात हॉटेलमधील वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा

पुणे : लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालकासह एका महिलेच्या व

सीमा भागात फूट पाडण्याचे कारस्थान ः संजय राऊत
इराणीं’चे अज्ञान की असंवेदनशीलता ? 
लोकशाहीच्या मजबूतीचे संकेत !

पुणे : लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी हॉटेल मालकासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुदर्शन हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

हॉटेल मालक सतीश शेट्टी (वय 59) याच्यासह एका महिलेच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार मारुती गोफणे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत. खंडाळ्यातील शिवाजी पेठ परिसरात बेकायदा मद्यसाठा करुन विक्री केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 68 हजार 220 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी अजय रामचंद्र जांभुळकर (वय 56, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जांभुळकर याच्याकडून देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. हवालदार मयूर आबनाने यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

COMMENTS