Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई फिल्म सिटी मध्ये इमली मालिकेच्या सेट वर कामगाराचा शॉक लागून मृत्यू

मुंबई प्रतिनिधी - एकीकडे संपूर्ण मुंबईत जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं, तर दुसरीकडे ‘ईमली’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेच्या सेटवर अत्यंत दु:खद

वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी
पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन
शरीर नव्हे, आत्माच खरा सुंदर! : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारतींचा परखड सामाजिक संदेश

मुंबई प्रतिनिधी – एकीकडे संपूर्ण मुंबईत जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं, तर दुसरीकडे ‘ईमली’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेच्या सेटवर अत्यंत दु:खद घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगावमधल्या दादासाहेब फाळके फिल्मसिटी इथल्या ‘ईमली’ या मालिकेच्या सेटवर एका क्रू मेंबरला वीजेचा झटका लागला. हा वीजेचा झटका इतका तीव्र होता की त्यात क्रू मेंबर गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला रुग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा जीव गेला. याविषयी स्टार प्लस आणि ईमलीच्या टीमशी बातचित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. या घटनेत ज्या व्यक्तीचं निधन झालं, त्याचं नाव महेंद्र होतं. गेल्या बऱ्याच काळापासून तो ईमली या मालिकेच्या सेटवर काम करत होता. 28 वर्षीय महेंद्रला काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर त्याच जागी वीजेचा झटका लागला होता. त्याच ठिकाणी 19 सप्टेंबर रोजी पुन्हा त्याला झटका लागला. महेंद्रने त्याच्या सहकर्मचाऱ्यांना त्या जागेबद्दल आधीच सूचना दिली होती आणि तिथे कोणाला न जाण्याचा सल्लादेखील दिला होता. वीजेचा तीव्र झटका लागल्यानंतर महेंद्रला जेव्हा तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा रस्त्यातच त्याने प्राण गमावले.

COMMENTS