Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू

 पुणे प्रतिनिधी- वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांची संख्याही गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. याच सो

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवार राहणार गैरहजर
 मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 
कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही .

 पुणे प्रतिनिधी– वेगाने विकसित होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांची संख्याही गेल्या काही वर्षात प्रचंड वाढली आहे. याच सोसायट्यांमधील मतदारांना आपल्याकडे आकृष्ट करण्याचा जोरदार प्रयत्न भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे. महापालिकेने ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात घेतलेल्या एका निर्णयाचे निमित्त झाले आणि या दोन्हीही राजकीय पक्षांचे मतपेटीचे राजकारण सुरू झाले. राष्ट्रवादीने आधी हा विषय हाती घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मेळावा घेत पालिका मुख्यालयात येऊन बैठकही घेतली. मात्र, निर्णय होऊ शकला नाही. त्यापाठोपाठ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याच विषयावर शिष्टाई करत भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यानुसार भाजपच्या पथ्यावर पडणारा निर्णय घेणे आयुक्तांना भाग पाडले.पिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याची विल्हेवाट संबंधित सोसायट्यांनीच लावायची, ते काम महापालिका करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आयुक्त शेखर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी घेतली होती. शहर स्वच्छतेसाठी ही बाब आवश्यक असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते. आयुक्तांच्या या निर्णयाला शहरभरातील सोसायट्यांनी विरोध सुरू केला. वेगवेगळ्या भागात कार्यरत असणाऱ्या ‘सोसायटी फेडरेशन’च्या माध्यमातून हा विरोध तीव्र होत गेला. पालिकेने सोसायट्यांचा कचरा उचलला नाही, तर, आम्ही तो कचरा महापालिकेच्या आवारात आणून फेकू, असा इशाराही फेडरेशनकडून देण्यात आला होता.

COMMENTS