Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला अजित पवार राहणार गैरहजर

प्रसिद्धीपत्रकातून नाव वगळल्याने चर्चांना उधाण

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अजित पवार असून, अजित पवार भाजपमध्ये जाणार इथपासून सुरु झालेली चर्चा अजूनही थांबायचे नाव घे

अजित पवार-चंद्रकांत पाटील यांच्यात ‘मतपेढी’साठी रस्सीखेच सुरू
 मी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाणारा माणूस आहे 
बारामतीला धडका मारू नका डिपॉझिट जप्त होईल.

मुंबई/प्रतिनिधी ः राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी अजित पवार असून, अजित पवार भाजपमध्ये जाणार इथपासून सुरु झालेली चर्चा अजूनही थांबायचे नाव घेत नाहीये. अजित पवारांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात अजित पवार गैरहजर राहणार असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

आज शुक्रवारी घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यकर्ता शिबिर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. मात्र या शिबिराच्या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात कुठेही अजित पवार यांचे नाव नाही. त्यामुळे अजित पवार या शिबिराला उपस्थित राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या अशा कार्यक्रमात अजित पवारांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा रंगणार आहेत. या शिबिरात शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे, माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे, अनिल देशमुख यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. मात्र, या सर्व वरिष्ठ नेत्यांमध्ये अजित पवारांचे नाव वगळल्याने चर्चांना उधाण आले आहे.

COMMENTS