Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य रेल्वेवर तीन दिवस पॉवर ब्लॉक

मुंबई ः मध्य रेल्वेकडून 19, 20 आणि 21 एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकातून 12.14 वाजता रात्री शेवटची लोकल

मध्य रेल्वेची लोकल सेवा पुन्हा खोळंबा
तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाने वाचवले 44 प्रवाशांचे जीव

मुंबई ः मध्य रेल्वेकडून 19, 20 आणि 21 एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटी स्थानकातून 12.14 वाजता रात्री शेवटची लोकल सुटेल. शेवटची 12.14 ची लोकल कसाराकडे जाणारी आहे. तर कर्जत आणि ठाणे या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्यात. पॉवर ब्लॉकमुळे कर्जत आणि खोपोलीच्या दिशेने जाणार्‍या नागरिकांचे मोठे हाल होणार आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तिन्ही दिवशी पॉवर ब्लॉक असणार आहे. मध्यरात्री 12:30 ते पहाटे 4:30 या वेळेत फलाटाच्या विस्ताराचे काम चालणार आहे. या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. तसेच लांबच्या पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असणार आहेत.

COMMENTS