Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुकानदाराला चप्पलाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार

डाय करूनही केस पांढरेच म्हणत घातला राडा

सोलापूर प्रतिनिधी / सोलापूर जिल्हातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने सलूनमध्ये जाऊन तुफान राडा घातला आहे. तुम्ही केलेलं हेअर डाय निघून

पुतळा हटवण्यावरुन झालेल्या वादातून दुकानदाराला मारहाण;घटना CCTV मध्ये कैद.
अंबरनाथमध्ये एका तरुणाला भररस्त्यात मारहाण.
दोन विद्यार्थिनी कोचिंगमधून बाहेर पडताच रस्त्यावर भिडल्या

सोलापूर प्रतिनिधी / सोलापूर जिल्हातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने सलूनमध्ये जाऊन तुफान राडा घातला आहे. तुम्ही केलेलं हेअर डाय निघून गेलं आहे, माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत. मला पुन्हा एकदा डाय करून द्या, असं म्हणत एका महिलेने सलून दुकानात येऊन दुकानातील काचा फोडल्याची घटना समोर आली आहे. एवढंच नव्हे तर दुसऱ्या दिवशी दुकानामध्ये येऊन सदर महिलेने सलून दुकानदाराला चप्पलाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार सोलापुरमध्ये  घडला आहे. या घटने प्रकरणी वर्षा काळे या महिलेवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहम्मद साजिद सलमाने यांनी तक्रार दिली आहे.

COMMENTS