Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटावर दुःखाचा डोंगर कोसळला

त्यांच्या सासरचे निधन

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. यापैकी एक नाव प्रिती झिंटा हिचं आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा आता

इंदौरमध्ये गॅस पाइपलाइन लीक झाल्याने भीषण स्फोट; अवघ्या काही सेकंदांत संपूर्ण घर कोसळले
चार्जशीटसाठी शासनाकडे मागितली परवानगी ; सिव्हिलमधील आग प्रकरण
राज्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी बृहत आराखडा तयार करा : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या लग्नानंतर परदेशात स्थायिक झाल्या आहेत. यापैकी एक नाव प्रिती झिंटा हिचं आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा आता बॉलीवूडमध्ये म्हणावी अशी सक्रीय नाही. पण सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रीय असते. मात्र आता प्रितीशी संबंधित एक दुःखद बातमी समोर आली आहे. सासऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर करत तिने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. प्रितीनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, प्रिय जॉन, मला तुमची तळमळ, दयाळूपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा शहाणपण आठवेल. तुमच्यासोबत शूट करायला जायला, तुमचे आवडते भारतीय पदार्थ बनवायला आणि तुमच्यासोबत गप्पा मारायला मला खूप आवडायचं. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी तुमचं घर आणि हृदयाचे दरवाजे उघडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुमच्याशिवाय ईस्ट कोस्ट पूर्वीसारखा राहणार नाही. तुमच्या आत्म्याला शांती लाभो

COMMENTS