Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गांजा व अमली पदार्थाची वाहतुक व विक्री करणारी टोळी जेरबंद

कर्जत ः कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील

जागरूक करणार कर न भरण्याचे आंदोलन ; मनपाला 10 कलमी मागण्या निवेदन
जावयाने केली पत्नी आणि सासूची हत्या
कोपरगाव नगरपालिकेत समस्यांचा पाऊस

कर्जत ः कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांना गुप्त चातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सांगवी, ता. शिरपूर, जि. धुळे येथून 3 इसम हे अहमदनगरवरुन एक भाड्याने रिक्षा करुन मिरजगाव परिसरात गांजा अमली पदार्थाची विक्री करण्याचे उद्देशाने येणार आहेत. त्यावरुन मिरजगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून मिरजगाव बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये पाठीमागील सीटवर बसलेल्या इसमांच्या पायाजवळ एक काळ्या रंगाची बॅग व कापडी पिशवी (झोला) विमल पान मसाला असे नाव लिहिलेली दिसली. हा माल पंचासमक्ष खोलून पाहिली असता बॅगमध्ये एक प्लॅस्टीकच्या कागदाचे आवरण केले गाठोडे व कापडी पिशवी झोल्यात एक प्लॅस्टीकचे आवरण केले गाठोडे मिळून आले. अशोक उर्फ बन्सीलाल सिताराम पावरा, वय : 23 वर्षे, रा. आंबा, ता. सिरपुर, जि. धुळे, सुनिल सुकलाल पावरा, वय 21 वर्षे, रा. सांगवी, ता. शिरपुर, मंगेश भिवाशा पावरा, वय 24 वर्षे, रा. आंबा, ता. शिरपुर यांना पकडले असता त्यांच्याकडे 11. 056 किलो ग्रॅम वजनाचा गांजा प्रत्येकी किलो 7000 रुपये प्रमाणे व मोबाईल असा एकूण 87392 रुपये मुद्देमाल मिळून आला. तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन संबधितावर मिरजगाव पोलीस स्टेशनला एन. डी. पी. एस. कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब) 29 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक  प्रकाश विक्रम पाटील हे करत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यासह सुनिल माळशिखरे, शंकर रोकडे, विकास चंदन, गणेश ठोंबरे, दिपक पवार, सुनिल खैरे, गंगाधर अंग्रे, अशोक रक्ताट यांनी केली.

COMMENTS