Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात – अंबादास दानवे

छत्रपती संभाजीनगर - लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्य

अंबादास दानवे यांचे विरोधी पक्षनेते पद धोक्यात ?
विरोधी पक्षनेते दानवे आणि पालकमंत्री भुमरेंमध्ये जुंपली  
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाईचा भडका उडाला – अंबादास दानवे (Video)

छत्रपती संभाजीनगर – लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज आहेत. दरम्यान, दानवे यांनी खैरेंबद्दलची आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. दानवे नाराज असल्याच्या बातम्या येताच त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी, “चंद्रकांत खैरेंनी मला सतत डावलले”, असे थेट खैरेंचं नाव घेऊन दानवे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 

यावेळी बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, “चंद्रकांत खैरे नेहमी मला डावलण्याचा प्रयत्न करतात. दोन दिवसांपूर्वी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजनाची देखील मला कोणतेही माहिती देण्यात आली नव्हती. तर, लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळो न मिळो, मला मिळावी माझी मागणी आहे. मी पक्षाचा बांधील शिवसैनिक आहे. पक्षाच्या विषयी संभ्रम निर्माण होऊ शकत नाही. इतर कोणताही उमेदवार दिला तर नुकसान होऊ शकतो, खैरे यांना उमेदवारी दिली तरी नुकसान होऊ शकतो. आता माझ्यामुळे खैरे पडले असे त्यांनी बोलून दाखवू नयेत असा खोचक टोलाही दानवे यांनी लगावला आहे. 

काही दिवसांपूर्वी चंद्रकांत खैरे यांनी प्रचार कार्यालयाच्या स्तंभ पूजन करून कामाला सुरवात केली. मात्र, याबाबत मला कोणतेही कल्पना नव्हती असे दानवे म्हणाले. मी उद्धव ठाकरे यांना सर्व काही सांगितले आहे. पक्ष प्रमुख्यांच्या कानावर काही बाबी जायला हवी आणि पक्षाने घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. अजूनही कोणत्याही उमेदवाराच्या नावाची घोषणा झालेली नाही. तर, छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी देखील इच्छुक आहे. माझी इच्छा मी यापूर्वी देखील बोलून दाखवली आहे. अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पण कुणालाही उमेदवारी दिल्यास शिवसैनिक म्हणून त्याचे काम करेल असेही दानवे म्हणाले. 

COMMENTS