Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झाडाखाली उभी असलेली बस जळून खाक

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे पुण्याहून राजस्थान कडे निघालेल्या लक्झरी बसला प्रचंड तापमानामुळे आग लागून या आगीत ही बस जळून भस

सेवाभावी पुरस्कार आणि ग्रंथप्रकाशनच खरे पुण्यस्मरण ः काका कोयटे
कोपरगाव नगरपरिषदेने काढली स्वच्छता जागृती फेरी
वारीत सर्व रोग निदान शिबिरात 170 रुग्णांची तपासणी

राहाता प्रतिनिधी ः तालुक्यातील निर्मळ पिंपरी येथे पुण्याहून राजस्थान कडे निघालेल्या लक्झरी बसला प्रचंड तापमानामुळे आग लागून या आगीत ही बस जळून भस्मसात झाली. लक्झरी बस जेवणासाठी एका हॉटेल जवळ थांबली होती. या बसमधील सर्व प्रवासी जेवणासाठी खाली उतरले आणि काही वेळातच या बसला आग लागली जेवणासाठी प्रवासी खाली उतरले असलेल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग विझवण्यासाठी प्रवारानगर राहाता येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी आल्या आणि ही त्यांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण मिळून आग विझवली. सध्या प्रचंड तापमान असल्यामुळे व गाडीत शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागली असल्याची  चर्चा घटनास्थळी सुरू होती.

COMMENTS