Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. लोखंडेंचा स्वीय सहायक दिशागतच ठरतोय विजयात अडथळा  

श्रीरामपूरला लोखंडेंच्या सभेचा फज्जा ; स्वीय सहायकाने जमवली रग्गड माया

डॉ. अशोक सोनवणेअहमदनगर ः शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षातून मोठा विरोध होता. मात्र तरीही लोखंडे यांना उमेदवारी मिळा

…तर, सदाशिव लोखंडे यांचा विजय आठवे आश्‍चर्य ठरेल
रत्नागिरी सा.बां.ची ‘निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर’वर ‘अर्थ’पूर्ण कृपादृष्टी !
सार्वजनिक बांधकाम विभाग नवनिर्मिती अणि सृजनशीलतेचे दुसरे नाव

डॉ. अशोक सोनवणे
अहमदनगर ः शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षातून मोठा विरोध होता. मात्र तरीही लोखंडे यांना उमेदवारी मिळाली असली तरी, लोखंडे ज्यांच्यावर विसंबून आहेत ते त्यांचे अतिशय जवळचे स्वीय सहायक शिवाजी दिशागतच त्यांच्या पराभवाचे धनी ठरल्यास नवल वाटायला नको. कारण लोखंडे यांच्या विजयात त्यांचा स्वीय सहायक शिवाजी दिशागत मोठा अडथळा ठरतांना दिसून येत आहे.
दिशागत चुकीचे दिशा-दर्शन करत असल्यामुळे खासदार लोखंडे यांचे सगळेच तंत्र बिघडतांना दिसून येत आहे. त्यामुळे श्रीरामपूरच्या सभेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. त्याचेबरोबर कोपरगावमध्ये सर्व सोबत असतांना आणि विरोधक शिल्लक नसतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सभा घेण्याची गरज पडते यावरून लोखंडे यांचे वारे कोणत्या दिशेने फिरत आहे, त्याची कल्पना येते. लोखंडे यांचे स्वीय सहायक शिवाजी दिशागत यांनी लोखंडे यांच्यापेक्षाही रग्गड माया जमा केली असून, ते आता लोखंडे यांना चुकीचे दिशा-दर्शन करत असल्यामुळे तेच पराभवाचे धनी ठरल्यास नवल वाटायला नको अशी चर्चा शिर्डी मतदारसंघात रंगतांना दिसून येत आहे. त्यांच्याच चुकीच्या सल्ल्यामुळे श्रीरामपूरच्या सभेचा फज्जा उडाला. कारण सभेसाठी कुणीही उत्स्फूर्तपणे आलेले नव्हते, त्यामुळे काही पक्षांचे पदाधिकारी निघून गेले. लोकांना गेटवर जाऊ नका म्हणून कार्यकर्ते विनंती करीत होते, तरी लोक ऐकत नव्हते. बरं झाले कार्यक्रम छोट्या जागेत होता, जर मोठ्या मैदानावर सभा असती तर, मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री विखे यांना माना खाली घालावयाची वेळ आली असती. विशेष म्हणजे यामध्ये मुख्यमंत्री, भाजप किंवा विखे या महायुतीच्या नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची काही एक चूक नाही. मूळ उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विषयी मतदारसंघात असलेली पूर्णपणे नाराजी व उदासीनतेचा सूर हे एकमेव कारण आहे. त्यांच्या मतदारसंघाशी तुटलेला संपर्क हा सर्वात जास्त कारणीभूत आहे अशी चर्चा एकूणच कार्यकर्ते आणि मतदार जाताना करीत होते.

उत्कर्ष रूपवते उमेदवार नसत्या तर? – एक राजकीय शक्ती म्हणून आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना इतिहास ओळखतो त्या दादासाहेब रूपवते यांच्या सुविद्य आणि सुशिक्षित तथा सुसंस्कृत कन्या उत्कर्षा रूपवते यांना शिर्डी मतदार संघातून वंचितने उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे उत्कर्षाताईंनी महाआघाडीचे उमेदवार वाकचौरे यांची अक्षरक्षः चाळण करण्याचे काम केले असल्याची चर्चा शिर्डी मतदारसंघात सुरू आहे. कारण महा विकासआघाडीला पडणारी मागासवर्गीय व काँग्रेसची मते ही सर्व ठराविक मते जी वाकचौरे यांना पडणार होती ती सर्व मते उत्कर्षा रूपवते यांच्या पारड्यात पडणार असून लाखभर मतांच्या पुढे उत्कर्षाताई मते घेऊन वाकचौरेंच्या तोंडचा मोठा घास घेऊन आपली भावी राजकीय शक्ती व महत्त्वाकांक्षा सिद्ध करणार असल्याचे दिसून येत आहे.

कोपरगावला फडणवीसांच्या सभेची गरज का वाटली ? – कोपरगाव तालुक्यात सद्यस्थितीला काळे कोल्हे परजणे औताडे, वहाडणे हे सर्वच नेते एकत्र दिसत आहे. जर विरोधकच शिल्लक राहिला नाही तरी देखील लोखंडेसाठी देवेंद्र फडणवीसांना प्रचारसभा घेण्याची गरज का भासली? हा सुज्ञ मतदारांना प्रश्‍न पडला आहे.

9822254475 वर संपर्क साधा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खासदारकी दोनदा मिळूनही खासदार सदाशिव लोखंडे यांना लोकाभिमुख कारभार करता आला नाही. केवळ भ्रष्टाचाराच्या कुरणात आपले हात कसे ओले होईल याची दक्षता त्यांनी नेहमीच घेतली. त्यामुळे त्यांच्यावर लोकांची प्रचंड नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील वाचकांनी आपले मते, तक्रारी, तसेच भ्रष्टाचारासंदर्भात असलेल्या तक्रारीची पोलखोल करण्यासाठी 9822254475 या क्रमाकांवर संपर्क साधावा. आपली ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

COMMENTS