Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाथ पंथी डवरी गोसावी समाजात जात पंचायत नाही

पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत खोटी तक्रार करणार्‍यावर कारवाईची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी ः नाथ पंथी डवरी गोसावी समाज्यातील  कांही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जात पंचायत होत असल्याची लेखी तक्रार

लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण
तुम्ही कशासाठी बाहेर पडला आहात ; भोसले-पाटील यांच्याकडून नागरिकांना विचारणा
साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे – डॉ. बाबुराव उपाध्ये

अहमदनगर/प्रतिनिधी ः नाथ पंथी डवरी गोसावी समाज्यातील  कांही विघ्नसंतोषी लोकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे जात पंचायत होत असल्याची लेखी तक्रार केली होती ती तक्रार खोटी व समाज्याची बदनामी करणारी असल्याने तक्रारदार मोहन भगवान चव्हाण  याच्याविरुद्ध कारवाई व गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांचे नेतृत्वाखाली नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देवून करण्यात आली.
 4 जुलै 2016 रोजी घोडेगाव ता.नेवासा येथे समाजबाधवांचा राज्यव्यापी मेळावा अशोक गायकवाड यांचे उपस्थितीत घेऊन जात पंचायत प्रथा बरखास्त करून संविधान व कायदा याचे पालन करण्याचे सर्वानुमते ठरले असतांना समाजातील जेष्ठ व्यक्ती नाथा नारायण बाबर व इतर पाच ते सहा लोकांच्या बद्दल खोटी तक्रार  करणारा मोहन चव्हाण यांच्यावर  कारवाई करण्याच्या मागणीसाठी नाथ पंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। याप्रसंगी बहुजन रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड, रवी आल्हाट, सुनील सावंत, नाथा बाबर आदींसह नाथ पंथी डवरी गोसावी समाजाचे समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS