Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू मॅनेजरकडून ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याची धमकी

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील घटना

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यात वाळू माफियांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रक

छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेच्या बहुउद्देशीय इमारतीचे भूमिपूजन
*LokNews24 I दखल अहमदनगरचा विकास का झाला नाही? l पहा LokNews24*
स्थानिक गुन्हे शाखा हवीय…आधी गुन्हेशोध लेखी परीक्षा द्या

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यात वाळू माफियांच्या दहशतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले असून तहसीलदार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना झुंड शाहिच्या बळावर धमकावण्याचे प्रकार वाढले असून तशीच एक घटना नुकतीच सुरेगाव येथे घडली आहे. कोळपेवाडी येथील मुक्त पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांना ट्रँक्टरखाली चिरडुन मारण्याची धमकी सुरेगाव शासकीय वाळु डेपोतील मँनेजर आंनद कदम यांनी दिल्याने तालुक्यात कायद्या व सुव्यवस्थेचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
    कोळपेवाडी येथील रमेश भोंगळ आपल्या वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम करत असतांना सोमवारी सांयकाळी सुरेगाव शासकीय वाळु डेपोत मँनेजर चे काम बघणारे आंनद भागवत कदम हे आपल्या पत्नीला घेवून दुकानावर येवून म्हणाले कि तुला पावत्या चेक करण्याचा काय अधिकार असुन, तु लय मोठा पत्रकार लागुन गेला आहे का? अशा एकेरी शब्दाचा उल्लेख करत पुन्हा आमच्या वाटेला गेला तर ट्रक्टर खाली चिरडुन जिवे मारण्याची धमकी दिली. सदर घटनेबाबत तालुक्यातील काही पत्रकारांनी  तालुका पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांना निवेदन देत वरील आरोपीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करत भविष्यात कुठल्याही अनुचित घटकाने पत्रकारांना धमकी देण्याची मजल गाठु नये यासाठी कठोर कारवाई ची मागणी केली. तालुका पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर 323,506 कलमान्वये अदखलपात्र गुंन्ह्याची नोंद करण्यात आली आहे . ग्रांमस्थाच्या प्रखर विरोधानंतरही जिल्हा गौण खणिज विभागाने सुरेगाव गोदावरी नदी पात्रातुन बोटी व हातपाटी मजुराच्या साह्याने नियम अटिस अधिन राहुन साडेचार हजार ब्रास वाळु उपसा करण्याचा व्हाईट स्टोन इंटरप्राईजेस मुंबई यांना 10 जुलै 2023 मध्ये परवाना देण्यात आला असुन महसूल प्रशासनाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे डेपो मध्ये नियम बाह्य डुप्लिकेट पावत्या द्वारे एकाची वाळु दुसर्‍यास, नदी पात्रात पोक्लेन जे. सि. बी टिप्पर, डंपर, ट्रँक्टर यासारखी वाहणे उतरून तिन फुटापेक्षा जास्त खोलीवर उत्खनन करणे, गौण खणिज खरेदी दाराकडुन मनमानी पध्दतीने भाडे वसुल करणे, नाशिक जिल्ह्यात प्रतिबंध असतांना वाळु टाकणे, रात्रीच्या सुमारास कॅमेरे बंद करुन वाहणे नदी पात्रात उतरून अवैधपणे वाळु उपसा करून चढ्या भावाने नागरिकांना विकणे, व्यावसायिक वाहनांचा वापर न करणे यावर अनेक वृत्तपत्रातुन भोंगळ यांनी बातम्या प्रसिद्ध करुन वेळोवेळी आवाज उठवला असल्याने पत्रकाराचे मानसिक खच्चीकरण करण्याच्या उद्देशाने धमकावल्याचा प्रकार घडल्याचे पत्रकारांचे विविध संघटनांचे म्हणणे आहे.  सुरेगाव शासकीय वाळु डेपोतुन ठेक्यापेक्षा जास्त वाळु चे उत्खनन झाल्याने वाळुचा सत्य परिस्थिती वर पंचनामा करण्याच्या तक्रारीला कोपरगाव तहसील कार्यालयाने कोणाच्या आदेशाने लाल फितीत बांधुन ठेवले आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे.

COMMENTS