Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा इशारा

तिरूअनंतरपुरम ः केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यात वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राज्यातील कोझिक

शिंदे – फडणवीस सरकारचे हे अधिवेशन सुतकात असल्यासारखे वाटत आहे – आ. अमोल मिटकरी 
जिल्हा सामान्य रुग्णालय समोर युवकांमध्ये हाणामारी | LOKNews24
तलाठी व मंडळ अधिकारी यांचा अजब कारभार

तिरूअनंतरपुरम ः केरळ सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यात वेस्ट नाईल तापाबाबत अलर्ट जारी केला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, राज्यातील कोझिकोड, त्रिशूर आणि मलप्पुरममध्ये सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्याचवेळी, त्रिशूरमध्ये या तापामुळे एका 79 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, हा आजार मच्छर चावल्याने होतो. तापासोबतच उलट्या, जुलाब आणि डोकेदुखीच्या तक्रारी आहेत. वेस्ट नाईल तापाच्या 10 पैकी सहा प्रकरणांमध्ये लक्षणे दिसत नाहीत. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने रुग्णांची कोणतीही अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही.

COMMENTS