Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरमध्ये दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू

चंद्रपूर ः गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी दोन वाजताच्

कोचिंग क्लासेसच्या विळख्यात कनिष्ठ महाविद्यालये; शिक्षणाचा बाजार आणि प्रशासनाचे मौन!नामधारी कॉलेजांचा सुळसुळाट, गुणवत्तापूर्ण महाविद्यालये मात्र विद्यार्थ्यांविना; शिक्षण व्यवस्थेतील गंभीर संकटाकडे शिक्षण विभागाचे  दुर्लक्ष
७ खासदारांच्या राजीनाम्यावर अण्णा हजारेंची सडेतोड प्रतिक्रिया; पक्षालाच धरले जबाबदार
मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना

चंद्रपूर ः गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना काल दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. सदर घटना ही रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. माहिती मिळताच गावकरी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली. मात्र वृत्त लिहेपर्यंत मृतकांचा शोध लागला नाही. गौरव विलास ठाकूर वय 14 वर्ष राहणार गोंडपिंपरी शिवाजी चौक, शौर्य भास्कर पिंपळशेंडे वय 15 वर्ष रा. गोंडपिंपरी शिवाजी चौक अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत.

COMMENTS