Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रादेशिक पक्ष काँगे्रसमध्ये विलीन होतील

खासदार शरद पवारांच्या वक्तव्याने उधाण

मुंबई ः आगामी काही वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष पुन्हा एकदा काँगे्रससोबत येतील. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्ष

शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
अजित पवारांना काका शरद पवारांनी दिली छोबीपछाड
आपल्या मर्जीनुसार शरद पवार पक्ष चालवतात

मुंबई ः आगामी काही वर्षांमध्ये प्रादेशिक पक्ष पुन्हा एकदा काँगे्रससोबत येतील. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत समन्वयाने काम करतील किंवा काँग्रेस पक्षात विलीन होतील, असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. एका मुलाखतीमध्ये त्यांनी आगामी काळात प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीबद्दल मत व्यक्त केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष देखील काँगे्रसमध्ये विलीन होणार का? या चर्चांना सुरुवात झाली आहे.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ येतील. हे पक्ष चांगले समन्वय राखून काम करतील. तर यातील काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचे हित लक्षात घेऊन काँग्रेस पक्षात विलीन देखील होतील. प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच काही सांगू शकणार नाही, असे पवार म्हणाले. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होईल का ? या प्रश्‍नावर देखील शरद पवार यांनी सूचक उत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले, मला काँग्रेस व राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. माझ्या मते वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरुंची विचारसरणी मानणारे पक्ष आहोत. आमच्यात फारसा फरक नाही. पण, सहकार्‍यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा असला तरी आमच्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी सामूहिक पद्धतीने तसेच पक्षातील इतर नेत्यांशी बोलून या बाबत निर्णय घेतला जाईल. पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणे तसेच त्यांचे विचार पटणे हे आमच्यासाठी अवघड आहे, असेही पवार म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. देशातील प्रादेशिक पक्षाबद्दल शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. शरद पवार म्हणाले, राजद, लोजप, समाजवादी पक्ष, टीडीपी, वायएसआरसीपी, भारत राष्ट्र समिती या प्रादेशिक पक्षांमध्ये जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे नेतृत्व हस्तांतरित होत आहे. हा काळ प्रादेशिक पक्षांच्यादृष्टीने स्थित्यंतराचा आहे. या स्थित्यंतरा दरम्यान, अनेक प्रादेशिक पक्षांचे प्रमुख भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकत आहेत. काहींवर घराणेशाहीचा आरोप होत आहे. त्यामुळे या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. या परिस्थितीत या पक्षांना एका मोठ्या छत्राखाली जाण्याची गरज वाटत असून लवकरच हे पक्ष काँगे्रससोबत जातील असा विश्‍वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे.

शरद पवारांचा पक्ष काँगे्रसमध्ये होणार विलीन ? – महाराष्ट्राचे राजकारण आजही शरद पवारांभोवती फिरतांना दिसून येत आहे. त्यातच त्यांनी काँग्रेस पक्षाबाबत मोठे विधान केले आहे. देशातील राजकारणात अनेक राजकीय पक्ष आगामी काळात काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांच्या या अंदाजामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत देखील शरद पवार यांनी खुलासा केला आहे. सहकार्‍यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबाबत कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

COMMENTS