Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भ्रष्टाचार चा आवाज उठविणाऱ्या जितेंद्र भावें यांचे पक्षाकडून निलंबन 

जनतेचा आम आदमी पक्षावर प्रश्न ?

नाशिक प्रतिनिधी - नाशिक मधून सर्वदूर पर्यंत आवाज उठविणारे जितेंद्र भावे यांनी न्हाई NHAI च्या विरोधात गुरुवार रोजी रात्री ९ नंतर फेसबुक ल

खोडशीत शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात बिबट्या अडकला
नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा
कर्जत नगर पंचायत, वंचित बहुजन आघाडी, तिसरा पर्याय

नाशिक प्रतिनिधी – नाशिक मधून सर्वदूर पर्यंत आवाज उठविणारे जितेंद्र भावे यांनी न्हाई NHAI च्या विरोधात गुरुवार रोजी रात्री ९ नंतर फेसबुक लाईव्ह करून सामान्य जनतेचा आवाज जगासमोर आणला तसे ते दररोज विविध विषय घेऊन आवाज उठवत असतात. तसे त्या रात्री न्हाई च्या व महापालिका च्या कर्मचारी यांनी अग्निशमन ची गाडी बोलवून द्वारका परिसरातील रस्ता देखील साफ केला होता. मात्र १०० लोक व्यवस्थेच्या पलीकडे जितेंद्र भावे अलीकडे अशी खरी लढाई आहेत त्यामुळंच भावे यांना पक्षाने पाय उतार केला असावा असा चंग नाशिक करांनी केला असावा अशी चर्चा आहेत. नाशिक करांना जितेंद्र भावे यांचे निलंबनाचे दुःख अजिबात वाटत नाही कारण नाशिककर भावेंना अगदी जवळून ओळखतात.म्हणूनच नाशिक करांना आम आदमी पक्षाबद्दल यक्ष प्रश्न पडला आहेत.?  पक्ष हा राजकारण करतो हा मुद्दाच मुळात पक्षात राहून भावे यांनी नाशिक मधून तरी पुसट केला परंतु त्याचे खलबत्ते हे विविध ठिकाणी असल्याने त्याचे दणके भावे पर्यंत पोहचत असतात मागे देखील हॉस्पिटलमध्ये केलेले आंदोलन यावरुन देखील त्यांना पक्षाकडून निलंबित केले होते .

नाशिक करांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाला योग्य माणूस असतांना त्यांचे निलंबन म्हणजे भावे देखील भ्रष्ट्राचारयुक्त पक्षात असावे असे विविध प्रश्न जनतेसमोर येत आहेत ? आणि लोक त्याची सोसिअल मीडियाच्या माध्यमातून चर्चाच देखील करत आहेत.  आम आदमी पक्षाला खरे तर जितेंद्र भावे यांच्या मुळे नाशिक मध्ये दिवस बघायला भेटले सर्व सामान्य जनता न्यायाच्या अपेक्षेने भावेंकडे बघत असतात. परंतु निलंबन म्हणजे आवाज दाबण्याचे साधन नाही आपली अधोगतीला जात असलेली मानसिकता आपणास व जनतेच्या ह्रासास कारणीभूत आहेत.  उद्याचा भारत उद्याचे नाशिक घडविताना भावे यांनी सर्व यंत्रणेचे देखील वाभाडे काढले. अगदी मीडिया देखील धुवून काढली. कोळसा घोटाळ्यात खासदार राजेंद्र दर्डा यांना शिक्षा झाली म्हणून भावे यांनी आपल्या भावना व्यक्त करत राग व्यक्य केला मात्र त्याचीच ही शिक्षा भावे यांना मिळाली आहेत.अशी चर्चा नाशिककर करत आहेत.

सदासर्वकाळ चांगले काम करणाऱ्या व्यक्तीचा इतिहास  भारत नेहमीच वाचत व बघत आलेला आहेत म्हणून भावेंचे निलंबन झाले म्हणून आम्ही दुःखी नाहीत ते अजून न्यायदानाची भूमिका घेऊन सर्व सामान्य जनतेला न्याय देत राहतील अशी आम्ही सर्व नाशिककर भावेंच्या पाठीशी आहेत. मात्र आम आदमी पक्ष हाच मुळात पुढे जाऊन भ्रष्ट्राचार करणारा निघणार असेल तर आम्ही नाशिक कर भावेंच्या बाजूने उभे राहून वेगळा पर्याय शोधू मात्र एका रात्रीत आवाज दाबणे हे भावेंकरिता पक्षाच्या वतीने तरी योग्य नाहीत.  – आम्ही नाशिककर 

आपणास सर्वांना माहिती आहेच की पक्षाच्या स्थापनेपासून मी आम आदमी पार्टी या राजकीय पक्षात काम करत आहे. माझ्या कुवतीप्रमाणे पक्षाचे काम करण्याचा प्रमाणिक प्रयत्न मी नेहमीच केला आहे. त्याचबरोबर सामान्य नागरिकांचे विविध प्रश्न, सामाजिक विषय आणि भ्रष्टाचार या विषयांत शक्य तिथे खंबीरपणे भूमिका घेत मी संघर्ष केला आहे. या सर्व कामात माझ्या अनेक सहकाऱ्यांनी मला मोलाची साथ आणि पाठिंबा नेहमीच दिला आहे. मागील काही काळात आप मधील अंतर्गत राजकारण हे अतिशय वेगळ्या पातळीवर गेलेले आहे याचाच परिपाक म्हणून माझे निलंबन मागच्या वेळी झाले होते. नंतर सर्वांच्या मागणीमुळे मला केंद्रीय नेतृत्वाने पक्षात पुन्हा घेतले आणि निलंबन रद्द केले. त्यानंतर सुद्धा मी पुन्हा माझे पक्षाचे काम जोरात सुरू ठेवले ते सुद्धा कोणतेही पद नसताना!

पण काल अचानक माझे पुन्हा एकदा १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलेले आहे. लोकमत समूहाचे दर्डा कुटुंबीय यांना कोळसा घोटाळा केला म्हणून जी शिक्षा झाली त्याबद्दल मी Facebook Live करून भ्रष्टाचार आणि घोटाळा याविषयावर जे स्पष्ट आणि प्रखर मतप्रदर्शन केले या कारणाने माझे निलंबन झालेले आहे. मी निलंबन आणि कारवाई चा नम्रपणे स्वीकार करत असुन आगामी काळात आम आदमी पार्टीचे कोणतेही काम यापुढे करणार नाही. जो पक्ष भ्रष्टाचार मुक्त देशासाठी निर्माण झाला आहे त्या  पक्षातून भ्रष्ट लोकांवर टीका केली म्हणून जर निलंबन होत असेल तर याहून मोठे विडंबन दुसरे कुठले नसेल. तरी यापुढे मी पक्षाचे कोणतेही काम करणार नसून तसेच पक्षाच्या कोणत्याही व्यासपीठावर उपस्थित राहणार नाही. निलंबन कारवाई फक्त माझ्यावरच झाली असल्यामुळे माझी पक्षातील सर्व सहकार्यांना विनंती आणि आवाहन आहे की आपण कोणीही पक्ष सोडू नये अथवा पक्ष विरोधी कोणतेही विधान करु नये. मी माझ्या निलंबना विरोधात कूठे ही न्याय मागणार नसून विनम्रपणे कारवाई चा स्वीकार करत आहे – जितेंद्र भावे

COMMENTS