Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय आनंदकर अ‍ॅकडमीच्या 12 खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत पटकावली 4 सुवर्ण, 8 रौप्य, 7 कांस्य पदके

श्रीगोंदा शहर ः महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोशियन आयोजित राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 3 ते 5 मे दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वा

 स्वामी समर्थ केंद्रास निधी मिळवून देण्यात आ. काळेंचे योगदान : आढाव
श्रीगोंदा शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करा – संभाजी ब्रिगेडची मागणी
बारामती, राहुरी निवडणुकीचे चित्र अस्पष्ट; अर्ज माघारी घेण्याच्या दिवशीच बिनविरोधचे चित्र होईल स्पष्ट

श्रीगोंदा शहर ः महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोशियन आयोजित राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा 3 ते 5 मे दरम्यान जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क अहमदनगर येथे संपन्न झाल्या.26 जिल्ह्यातील 900 खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेमध्ये श्रीगोंदा येथील संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी सहभाग घेत 4 सुवर्ण, 8 रौप्य, 7 कांस्यपदके पटकावून राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी आपली निवड पक्की केली.
चिल्ड्रेन व कॅडेट वयोगटात श्रावणी लकडे, जय शेलार यांनी सुवर्ण, सई सुपेकर, शर्वरी गोलांडे, प्रतिक आमले, प्रज्वल ढवळे यांनी रौप्य तर सृष्टी काळे, आरव कुलकर्णी, प्रणव रायकर यांनी कांस्य पदक पटकावले.वरील खेळाडूंची 21 ते 26 मे दरम्यान श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणार्‍या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच जूनियर वयोगटात सिद्धी वाळुंज हिने सुवर्ण तर सोफिया शेख, साक्षी गांजूरे यांनी कांस्य पदक मिळवून त्यांची 19 ते 23 जून दरम्यान सोलान, हिमाचल प्रदेश येथे होणार्‍या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबरोबरच स्वराली फडताळे, सृष्टी कोथिंबीरे, अर्पिता गोरे, अंतरा बळे,सिद्धेश भंडारी, विराज बरबडे, ओंकार ननावरे या खेळाडूंनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.यशस्वी खेळाडूंना अकॅडमीचे प्रशिक्षक मास्टर जयेश आनंदकर तसेच महाराष्ट्र राज्य किकबॉक्सिंग संघाचे कोच सिद्धेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले.या सुवर्ण कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घन:शाम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, मा.आमदार राहुल दादा जगताप, नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष ज्योतीताई खेडकर, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंगचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS