शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी कर्जत पोलिसांकडून उस्मानाबादमधून जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्यावर गोळीबार करणारा आरोपी कर्जत पोलिसांकडून उस्मानाबादमधून जेरबंद

कर्जत : प्रतिनिधी दि. १० एप्रिल २०२१ रोजी २ ते ३ वाजेच्या दरम्यान कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोडी ता. कर्जत येथील शेतकऱ्याची शेळी चोरुन घेवुन

मुंबईतील पोलिसांंच्या 28 जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द
रेल्वे स्थानकावर अचानक बेशुद्ध पडला तरुण… पोलिसाने दिले जीवदान (Video)
पोलिस प्रशासनासह प्रसार माध्यमांनी दाखविली चुणूक;आंदोलनकर्त्यांनी मानले आभार !

कर्जत : प्रतिनिधी

दि. १० एप्रिल २०२१ रोजी २ ते ३ वाजेच्या दरम्यान कर्जत पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोडी ता. कर्जत येथील शेतकऱ्याची शेळी चोरुन घेवुन चोरटे जात असताना शेळ्यांचे करडांनी आरडा ओरडा केल्याने शेतकऱ्याला जाग आली असता त्याला शेळी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्याचे शेजारी राहणारे भाउबंद व नातेवाईक यांना आवाज देवुन बोलावुन घेतले व ते चोरट्यांचा पाठलाग करु लागले. शेतकरी आपला पाठलाग करत आहेत. हे पाहुन चोरांनी शेळी सोडुन पळुन जावु लागले त्यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना पकडले असता त्यांनी शेतकऱ्यावर अग्निशस्त्रातुन फायर करुन दोन शेतकऱ्याना गंभीर जखमी केले होते. गोपनिय बातमीदाराकडुन सदरचा प्रकार हा अमऱ्या दत्तु पवार व करण पंच्याहत्तर काळे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यातील आरोपीचा पोलीसांनी शोध घेऊन दि. २३ एप्रिल रोजी अमऱ्या उर्फ अमर दत्तु पवार हा नळी व़डगाव ता. भुम जि. उस्मानाबाद येथे येथून मोठ्या शिताफीने अटक केले. 

त्यावेळी करण पंच्याहत्तर काळे पोलीसांना गुंगारा देवुन पळुन जाण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासुन तो अद्याप पावेतो फरार होता. दि. ८ ऑक्टोबर रोजी करण पंच्याहत्तर काळे हा पाथरुड ता. भुम जि. उस्मानाबाद येथे येणार असलेबाबत गोपनिय बातमीदाराकडुन पोलीसांना माहिती मिळाल्याने लागलीच कर्जत पोलीस स्टेशनचा स्टाफ सदर ठिकाणी रवाना होवुन फरार आरोपी करण पंच्याहत्तर काळे याचा शोध घेवुन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. 

त्याच्यावर

1). कर्जत पोलिस स्टेशन गु.र.न 213/2021, भा. द. वी. कलम 307

2).नगर तालुका पोलिस स्टेशन गु.र.न. 434/2021, भा. द. वी. कलम 395,397

3). भूम पोलीस स्टेशन गु.र.न 45/2021, भा. द. वी. कलम 306

4). सातारा तालुका पोलीस स्टेशन गु. र. न. 62/2016, 395

5).सातारा तालुका पोलीस स्टेशन गु. र. न. 65/2016, भा द वी कलम 394, 34

6). सातारा तालुका पोलीस स्टेशन गु. र. न. 76/2016, भा द वी कलम 394, 34

7). मेंढा पोलीस स्टेशन गु. र. न. 14/2016, भा द वी कलम 394

8). नगर तालुका पोलीस स्टेशन गु. र. न. 174/2009, भा द वी कलम 399, 402

9). कर्जत पोलिस स्टेशन गु. र. न. 519/2021, भा द वी कलम 394, 34 

याप्रमाणे कर्जत, नगर, भूम, सातारा या ठिकाणी जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीने शेतकऱ्यांनी पकडल्याने गोळीबार केल्याचे कबूल केले आहे.

सदरची कारवाई विभागीय पोलेस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक अमरजित मोरे, पोलीस नाईक रविंद्र वाघ, शाम जाधव, पोकाँ देविदास पळसे, पोकाँ महादेव कोहक, पोकाँ शाहुराजे तिकटे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास अमरजित मोरे हे करत आहेत.

COMMENTS