Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमा भागात फूट पाडण्याचे कारस्थान ः संजय राऊत

सांगली : भाजप मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे कारस्थान करत आहे. बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. मराठी माण

रवींद्र वायकर डरपोक ः संजय राऊतांची टीका
केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न
 ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास कमी असतो, तेच लोक ज्योतिष्यासमोर हात दाखवतात

सांगली : भाजप मराठी माणूस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे कारस्थान करत आहे. बेळगावची निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही प्रचाराला येऊ असे आश्‍वासन उबाठा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी समितीला दिले. सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सांगलीत राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, बेळगावची निवडणूक ही मराठी माणूस म्हणून लढवावी लागेल. बेळगावात मराठी माणसांचे संघटन इकडे तिकडे जाऊन चालणार नाही, असे म्हणत भाजपा सातत्याने मराठी माणूस आणि एकीकरण समिती फूट पाडण्याचे कारस्थान करत आला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणूक मराठी माणूस म्हणून लढावी लागेल. तुम्ही लढा आम्ही प्रचारासाठी येतो, असे आश्‍वासनसुद्धा राऊत यांनी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

COMMENTS