Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता

पुणे : पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्य

मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून हत्या
प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंगचा घटस्फोट
रक्तदान करुन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

पुणे : पुण्यातील प्रणव कराड नावाचा तरुण अमेरिकेतून बेपत्ता झाला आहे. हा तरुण अमेरिकेत एका जहाजावर काम करत होता. आता तो अचानक बेपत्ता झाल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत असून, त्याचा तीन दिवसांपासून शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विल्समन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. येथे तो शिफ्ट डेस्कला काम करायचा. गेल्या 3 दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला. प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असेही त्याच्या वडिलांनी सांगितले आहे. गोपाळ कराड असे बेपत्ता तरुणाच्या वडिलांचे नाव आहे. माझा मुलगा मला परत मिळाला पाहिजे. कंपनी कोणतीही माहिती व्यवस्थित देत नाही. मी याबाबत पोलिसांत देखील तक्रार दाखल केली आहे. आमचे शोधकाम सुरू आहे, असे कंपनी म्हणत आहे. पोलिसांकडून देखील हवी तशी मदत मिळत नाही, याबाबत कराड यांनी वारजे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे.

COMMENTS