Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादानंतर मुलीची गळा दाबून हत्या

आईविरोधात हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल

मुंबईः उभयतांमध्ये झालेल्या वादानंतर आईने मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार वांद्रे पूर्व येथे घडला. मुलीच्या प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद

’लिव्ह इन’चा हट्ट धरणार्‍या तरुणीची हत्या
आई वडिलांनी मुलीला फेकून दिले नाल्यात
दारू पिताना झालेल्या वादातून एकाची हत्या

मुंबईः उभयतांमध्ये झालेल्या वादानंतर आईने मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार वांद्रे पूर्व येथे घडला. मुलीच्या प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये वाद झाला होता. त्यातून मुलगी हाताला चावल्यामुळे संतापलेल्या आईने मुलीची हत्या केली. त्यानंतर तिला मिरगी आल्याचा बनाव केला. पण वैद्यकीय तपासणीत मुलीचा गळा दाबून मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला ताब्यात घेतले.
 भूमिका बागडे (19) असे मृत मुलीचे नाव असून ती वांद्रे पूर्व येथे आई टिना (40) सोबत राहत होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे प्रेमसंबंधांवरून आईसोबत भांडण झाले. प्रेमसंबंध आईला मान्य नसल्यामुळे मुलगी संतापली व तिने आईच्या हाताचा चावा घेतला. त्यात महिलेच्या तर्जनीला गंभीर इजा झाली. त्यामुळे संतापलेल्या आईने मुलीचा गळा आवळला. त्यात तिचा मृत्यू झाला. याप्रकारामुळे घाबरलेल्या आईने मुलीला मिरगी आल्याचा बनाव करून तिला डीएन देसाई रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी भूमिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तपासणीत मुलीच्या गळावरील व्रण व आईच्या हाताला झालेली जखम यावरून संशय आल्यामुळे वैद्यकीय तपासणी केली असता मुलीचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी स्वतः तक्रार दाखल करून हत्या व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS