ओझर प्रतिनिधी - मनुष्य जन्म दुर्लभ आहे.आणि क्षणभंगुरही आहे.आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर शिवभक्ती करणे आवश्यक आहे.'ज्याने शिव भक्ती ना
ओझर प्रतिनिधी – मनुष्य जन्म दुर्लभ आहे.आणि क्षणभंगुरही आहे.आपल्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर शिवभक्ती करणे आवश्यक आहे.’ज्याने शिव भक्ती नाही केली,त्याची माय व्यर्थ श्रमली’ हे संत वचन आहे. शिवभक्ती करणे हा जगातला सर्वात श्रेष्ठ व मोठा धर्म आहे. पत्रम्-फलम्-पुष्पम्-तोयम् आशा अल्पशा पूजेने देखील भगवान शिव प्रसन्न होतात. शिवभक्ती केल्याने आपणच काय आपल्या पितरांचा देखील उद्धार होतो.असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.
ओझरचे ग्रामदैवत नागेश्वर महादेव मंदिर येथे नव्याने शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.तीन दिवसीय शिवलिंग स्थनापा उत्सवाच्या सांगते प्रसंगी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज उपस्थित होते.यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभहस्ते भगवान नागेश्वराच्या नवीन शिवलिंगाची स्थापना करण्यात आली.यावेळी परमपूज्य बाबाजींनी प्रारंभी श्रीगणेश पूजन,वृषभ देवता (नंदी) पूजन व यानंतर भगवान नागेश्वर महादेवाची स्थापना व पूजन केले.यावेळी संत-ब्राह्मण-अतिथी पूजन करण्यात आले.यज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित भाविकांना धर्मउपदेश करतांना समर्थ सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज म्हणाले की, दुर्लभ असलेला मनुष्य देह आपल्याला मिळाला आहे.हे आपले सर्वात मोठे भाग्य आहे कारण स्वर्गीची अमर इच्छिती मृत्यूलोकी जन्म व्हावा. याचा अर्थ लक्षात घ्या. भक्तीचा आनंद केवळ मनुष्य देहातच मिळू शकतो.जगात सर्वात श्रेष्ठ धर्म कोणता हे जाणण्यासाठी कात्यायनी ऋषींनी पायाच्या एका अंगठ्यावर शंभर वर्ष तपश्चर्या केली.तेव्हा आकाशवाणी झाली की सारस्वत नदीच्या किनारी आश्रम असलेले सारस्वत नावाचे ऋषी तुम्हाला याचे उत्तर देतील तेव्हा ऋषींनी मला माझ्या मातेकडून उपदेश मिळाला की, साक्षात धर्म असलेल्या ऋषभ देवता (नंदी) वर आरूढ असलेल्या भगवान शिवाची भक्ती करणे हाच सर्वात मोठा व श्रेष्ठ धर्म आहे.मात्र हे जाण्यासाठी कात्यायनी ऋषींना शंभर वर्ष तपश्चर्या करावी लागली.याचे महत्व लक्षात घ्या.जगदगुरु जनार्दन स्वामी महाराजांनी अनेकदा आपल्या अमृतवाणीतून भगवान शिवाची भक्ती करण्याचा उपदेश केला आहे. प्रत्यकाने शिवभक्ती करा, शिव-शिव अक्षरे दोन जो वदे रात्रंदिन धन्य तयाचा संसार’..शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे या प्रमाणे भगवान शिवाच्या नामाचा जप करा. सतत पुण्यकर्म करत रहा.जपानुष्ठान करा.श्रमदान करा.लहान मुलांवर बालवयातच योग्य संस्कार करा.हिंदू मंदिरे म्हणजे मुलांना घडविणारे संस्कार केंद्र आहेत.आपल्या मुलांना रोज मंदिरात पाठवा असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मंदिराचे व्यवस्था प्रमुख पोपटराव शेलार (सर),संस्थापक अध्यक्ष दीपक मोटकरी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तुषारगुरू पुराणिक,दिलीपराव लढ्ढा यांचे पूजन करण्यात आले. तसेच जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रवक्ते राजाराम पानगव्हाणे,केशव जाधव यांचा अतिथी सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश दळवी यांनी केले.
COMMENTS