Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.जयश्री थोरात यांची युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड

संगमनेर : कॅन्सर तज्ञ आणि युवानेत्या डॉ. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्र

वंचितासाठी लढा उभा करणाऱ्या संघर्ष योद्धाचा प्रवास थांबला
नियमित पिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान द्या – आ. आशुतोष काळे
अनाथांसाठी बालसंस्कार शिबिरे ही मानवतेची तीर्थस्थळे आहेत ः डॉ. बाबुराव उपाध्ये

संगमनेर : कॅन्सर तज्ञ आणि युवानेत्या डॉ. जयश्री थोरात यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कृणाल राऊत, महाराष्ट्राचे युवक काँग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घेषणा केली.
डॉ.जयश्री थोरात या सुपरीचित कॅन्सर तज्ज्ञ असून, त्या मुंबई येथील टाटा हॉस्पिटलमध्ये कार्यरत होत्या. अभ्यासू आणि सेवाभावी वृत्तीमुळे अल्पावधीतच त्यांनी कॅन्सर उपचाराच्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला. आज त्या कॅन्सर रुग्णांना टाटा हॉस्पिटल आणि एसएमबीटी हॉस्पिटल येथे योग्य उपचारांच्या बाबतीत मार्गदर्शन करतात. युवा संवाद या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील 153 गावातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या, दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवाद च्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्‍नांची यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सोडवणूक केली. त्या वेळीच युवकांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर डॉ. जयश्री या युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या. डॉ. जयश्री यांनी कार्यकर्ता बनून संघटनेचे काम करण्याला प्राधान्य दिले ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या रूपाने युवक काँग्रेसला अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सेवाभावी चेहरा मिळाला असल्याची भावना, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केली. संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष निलेश थोरात यांची अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड करण्यात आली असून, संगमनेर सारख्या व्यापक तालुक्यात काम करण्याचा निलेश थोरात यांचा अनुभव जिल्ह्याच्या युवक काँग्रेसला नक्की उपयोगी पडेल असा आशावाद, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी व्यक्त केला.

COMMENTS