अमरावती : खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना ही धमकी आल्याचे सांगण्या
अमरावती : खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून राणांना ही धमकी आल्याचे सांगण्यात आले आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअॅपवर एक ध्वनिफित पाठवून ही धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
धमकी देणार्या व्यक्ती विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवनीत राणा या आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना त्यांना ही धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांना व्हॉट्सअॅपवर एक ध्वनिफित पाठविण्यात आली होती. यामध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. जवळपास तीन मिनिटांची ही ध्वनिफित आहे. गेल्या 3 मार्च रोजी दुपारी 2 वाजून 9 मिनिटांनी ही ध्वनिफित नवनीत राणा यांच्या व्हॉट्सअॅपवर आली होती. त्यानंतर 2 वाजून 13 मिनिटांनी याच क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हाईस कॉल करण्यात आला, तो नवनीत राणा यांनी उचलला नाही. त्यानंतर पुन्हा दुपारी आणखी एक ध्वनिफित आली, त्यानंतर राणा यांनी तक्रार दाखल केली आहे.
COMMENTS