Homeराजकारण

माफी मागा अन्यथा गाल व थोबाड रंगवू शकतो-रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजपचे नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवाद

राष्ट्रवादी काँग्रेसने गाढव मोर्चा काढून केला केंद्र सरकारचा निषेध (Video)
नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!
परतीच्या पावसाने हेळगावसह कालगाव परिसरास झोडपले

राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा भाजपचे नेते प्रविण दरेकर यांचा तोल सुटला. या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दरेकर यांना लक्ष्य केलं जात असून, राष्ट्रवादी महिला आघाडीने ‘माफी मागा, अन्यथा गाल व थोबाड रंगवू शकतो’, असा इशारा दरेकरांना दिला आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी इशारा दिला असून, त्यांनी चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली आहे.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. सुरेखा पुणेकर यांच्या प्रवेशावरुन राष्ट्रवादीवर टीका करताना प्रविण दरेकरांची जीभ घसरली. ‘गरिबांकडे बघण्यासाठी वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे’, असं विधान दरेकर यांनी केलं.

प्रविणजी दरेकर, आपण विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते. विधान परिषद हे सभागृह खरंतर ज्येष्ठांचं, वैचारिक आणि अभ्यासू लोकांचं सभागृह आहे. पण आज ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं. त्या वक्तव्यावरून असं दिसतंय की आपला या वैचारिकतेशी आणि अभ्यासाशी दूरदूरपर्यंत कुठेही काही संबंध नाही. आपण ज्या पद्धतीचं वाक्य उच्चारलं; ते आता मला घ्यायला सुद्धा लाज आणि संकोच वाटतोय. पण घेण नाईलाज आहे. आपण बोललात की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे. प्रविणजी दरेकर आपण महिलांबद्दल असं बोलत आहात. महिलांना दुय्यम वागणूक देणं ही तुमची परंपरा आहे. आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतेय. ती आपल्या वैचारिकतेची दारिद्रयता दाखवून देतेय आणि हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे’, अशी टीका रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांच्यावर केली आहे.

चित्रा वाघ यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा…

आपल्या पक्षातील काही महिला आहेत. त्या बाहेर फिरताना आम्ही महिलांच्या किती कैवारी आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करताहेत. आज मला त्यांची कीव वाटतेय. त्या अशा पक्षात काम करताहेत, की त्यांच्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यावरून तुमच्या पक्षाची संस्कृती काय आहे, ती आज समजली आहे. प्रविणजी दरेकर आपण ज्या पद्धतीचं वक्तव्य केलंय, त्याच्याबद्दल आपण महिलांची माफी मागावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा अपमान करणाऱ्याचं गाल आणि थोबाडही रंगवू शकतो, याची सुद्धा जाणीव आपण ठेवावी’, असा इशारा रुपाली चाकणकर यांनी प्रविण दरेकर यांना दिला आहे.

COMMENTS