कोपरगाव तालुका ः मागील दोन वर्षापासुन पर्जन्यमान जेमतेम आहे परिणामी फळफळावळांच्या झाडांना त्याचा मोठा फटका बसून निसर्ग वातावरणांतील पशु-पक्षी यां
कोपरगाव तालुका ः मागील दोन वर्षापासुन पर्जन्यमान जेमतेम आहे परिणामी फळफळावळांच्या झाडांना त्याचा मोठा फटका बसून निसर्ग वातावरणांतील पशु-पक्षी यांची चहल पहल कमी झाली होती मात्र यंदा हे चित्र बदलले असुन तालुक्यातील संवत्सर परिसरातील पंचायत समितीचे माजी सभापती कारभारीभाउ परजणे यांच्या लक्ष्मणवाडी हददीतील शेतावर असलेल्या 25 ते 30 अंबा वृक्षाला यंदा मोठ्या प्रमाणांत मोहोर आला आहे त्यामुळे निसर्गसंपदेतील पशु-पक्षांच्या चिवचिवाटात वाढ झाली आहे.
याबाबत माजी सभापती कारभारी परजणे म्हणाले की, अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव राहाता तालुके हे अवर्षणग्रस्त स्थितीतले. मात्र इंग्रज ब्रिटीशांनी या भागात गोदावरी डावा व उजवा तट कालव्यांची निर्मीती करून येथील शेती क्षेत्र वहितीखाली आणले. त्यातुन मोठया प्रमाणांत वृक्षांची लागवड केली. पढेगांव सेक्शन अंतर्गत गोदावरी डाव्या कालव्याच्या दोन्ही बाजुस जांभळीचे झाडे खुप होती त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना जाता येता रानमेवा पाहिजे त्या प्रमाणांत खावयांस मिळत होता.
आपल्याला पहिल्यापासुन शेतीची आवड असुन वनसंपदेतील फळफळावळांची झाडे रोपण करून ती वाढविली. मागील दोन वर्षे अंबा वृक्षासह इतर फळांच्या झाडांना मोहोर बहर कमी प्रमाणांत आला परिणामी त्याचे उत्पादनही घटले. मात्र चालु वर्षी आपल्या वस्ती परिसरात लावलेल्या अंबा वृक्षांना वेळेआधीच प्रचंड मोहोर लगडला आहे. सोनेरी मखमल परिधान करून ही वनराई यंदाच्या उन्हाळयात अधिकचे फळ उत्पादन करण्यासाठी सक्षम होतांना दिसत आहे. अंब्यांच्या झाडांना मोहोरसह कै-याही लगडल्यांने त्यावर पक्षांचा किलबिलाट वाढला आहे., आमचे सर्व कुटुंबिय या मोहोराची विशेष काळजी घेत आहे. छानसा सुवास दरवळत असल्याने सकाळ संध्याकाळ परिसरातील विविध पक्षी अंब्याच्या झाडावर बसुन आपल्या आवडीची गाणी गातांना दिसतात. हे चित्र पाहुन बहुतांष अबाल वृध्दांना ते अधिक आकर्षीत करीत आहे असेही ते म्हणाले. रस्त्यांने ये जा करणारे, रेल्वेतुन प्रवास करणारे सर्वचजण या अंबा फळ झाडांचा मोहोर आपापल्या भ्रमणध्वनीत छायाचित्राद्वारे टिपुन घेतांना दिसतात. जगाच्या एकुण अंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन एकटया भारत देशात होते. येथे 1300 वेगवेगळ्या अंबा वृक्ष जाती आहेत. आपल्या देशाचे अंबा हे राष्ट्रीय फळ आहे असेही ते म्हणाले.
COMMENTS