Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढे विकास सोसायटीच्या सचिवाकडून 60 लाखाचा अपहार

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील वाढे विकास सोसायटीचा सचिव राजेंद्र भानुदास चव्हाण (वय 46, रा. फडतरवाडी) याने अपहार केल्याच्या तक्रारी गेल्या

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 733 नवीन रुग्ण
‘क्रिप्टो करन्सी’ चा 80 हजार डॉलरचा डिजिटल दरोडा उघडकिस आणण्यास एलसीबीला यश
विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्यातील वाढे विकास सोसायटीचा सचिव राजेंद्र भानुदास चव्हाण (वय 46, रा. फडतरवाडी) याने अपहार केल्याच्या तक्रारी गेल्या एक वर्षापासून सातारा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे झाल्या होत्या. त्यानुसार वाढे विकास सोसायटीचे सरकारी लेखा परिक्षण लेखा परिक्षक दत्तात्रय पवार यांनी केले. त्यामध्ये तब्बल 60 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब उघडकीस आली असून त्या प्रकरणी सचिव राजेंद्र चव्हाण व लिपीक रमेश नलावडे या दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी लगेच त्या दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्या दोघांना दि. 13 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकारामुळे सातारा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील वाढे येथील विकास सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या एक वर्षापासून त्याबाबत मागणी होत होती. वाढे विकास सेवा सोसायटीच्या सभासदांनी केलेल्या लेखा परीक्षणाच्या मागणीनुसार लेखा परीक्षण करण्यात आले. त्यामध्ये त्रुटी आढळून आल्या असून त्यानुसार सातारा पोलीस ठाण्यात सचिव चव्हाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखा परीक्षक दत्तात्रय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वाढे विकास सोसायटीचे सचिव राजेंद्र चव्हाण याने सोसायटीमधील सभासदांच्या सभासद खतावणी रक्कमा जमा केल्या. मात्र, रोजकिर्तीस जमा केल्या नाहीत. तसे सभासद शेअर्स खतावणी जमा केली. मात्र, त्यामध्ये चुकीची नोंद केली आहे. रोख शिल्लकेचा अपहार, हातावरील शिल्लक कमी करुन सचिव चव्हाण याने दाखवले आहे. खतावणी रक्कमा जमा व ताळेबंद बाकी यामधील रक्कमेत फरक आहे. सभासद ऊस, आर्थिक दुर्बल कर्ज खाती आलेले कर्ज वसुल रक्कम कर्ज खतावणी व रोजकिर्दवर जमा लिहिणे संस्थेच्या बँक केसीसी दुर्बल खात्यावर जमा केले नाहीत. अशा प्रकारचा गैरव्यवहार नोंद करुन सोसायटीमधील दि. 31 मार्च 2019 ते दि. 1 एप्रिल 2022 अखेर मुद्दल रुपये 52 लाख 85 हजार 638 रुपये 35 पैसे व व्याज 2 लाख 72 हजार 717 रुपये असा एकूण 55 लाख 58 हजार 355 रुपये दि. 1 एप्रिल 2019 ते दि. 31 मार्च 2020 अखेर 4 लाख 33 हजार 615 रुपये अशी 59 लाख 25 हजार 900 रुपयांचा लाभ स्वतःच्या फायद्याकरता पदाचा गैरवापर करुन जाणिवपूर्वक खोट्या नोंदी करुन शिल्लक चुकीची दाखवून तसेच कर्जदाराची आलेली जमा करुन घेतली. परंतू ती बँकेत न करता स्वतःकडे ठेवून सभासदांची आणि संस्थेची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी संशयित म्हणून चव्हाण व लिपीक नलावडे यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना न्यायालयाने दि. 13 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

COMMENTS