Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंड विधानसभेत समान नागरी विधेयक सादर

उत्तराखंड- उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेत समान नागरी विधेयक सभागृहात सादर केले. विधेयक सादर होताच सत्ताधारी आमदार

सोनाली कुलकर्णीचे लग्न ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवणार.
आजचे राशीचक्र रविवार, ३१ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा
कोपरगाव तालुक्यातील सावकारी रॅकेट उघड

उत्तराखंड- उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी आज विधानसभेत समान नागरी विधेयक सभागृहात सादर केले. विधेयक सादर होताच सत्ताधारी आमदारांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. विरोधकांना या विधेयकावर चर्चेची मागणी करत विधानसभेत गदारोळ केला. विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. उत्तराखंड विधानसभेत यूसीसी विधेयक मंजूर झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होईल. यासह, यूसीसी लागू करणारे उत्तराखंड हे स्वातंत्र्यानंतर देशातील पहिले राज्य बनेल. उत्तराखंडाचा वापर समान नागरी कायद्याच्या प्रयोगासाठी केला जात आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. मुस्लीम संघटनांनी देखील यावर आक्षेप घेतला आहे.

समान नागरी विधेयकाला होणारा विरोध पाहून विधानसभा परिसरात कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. धामी सरकारचे हे पाऊल २०२४ च्या निवडणुकीपूर्वी गेम चेंजर ठरू शकते, असे मानले जात आहे. समान नागरी कायदा लागू झाल्यास राज्यात जात आणि धर्माचा विचार न करता सर्वांसाठी समान नागरी कायदा असणार आहे. यानंतर सर्व नागरिकांसाठी समान विवाह, घटस्फोट, जमीन, मालमत्ता आणि वारसा यासाठी समान कायदा असणार आहे.

COMMENTS