भाजपच्या फटकार मोर्चाला शिवसेनेचा ’फटकार’!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपच्या फटकार मोर्चाला शिवसेनेचा ’फटकार’!

अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला; मात्र शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना शिवसेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवले.

Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा
मेट्रोच्या डबलडेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला ट्रक, मोठा घातपात घडवण्याचा डाव? l LokNews24
नोकरीची पार्टी पडली महागात, अपघातात तिन मित्र जागीच ठार | LOK News 24

मुंबई / प्रतिनिधी: अयोध्येतील राम मंदिर भूखंड खरेदीत झालेल्या घोटाळ्यावरून शिवसेनेने टीका केली होती. त्याचा निषेध म्हणून भाजपच्या युवा मोर्चाने आज दादरच्या शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढला; मात्र शिवसेना भवनासमोर शिवसैनिकही मोठ्या संख्येने जमल्याने पोलिसांनी या आंदोलकांना शिवसेना भवनापासून पाच किलोमीटर अंतरावरच अडवले. तसेच या मोर्चेकर्‍यांची धरपकड करण्यात आली; मात्र दोन्ही पक्षांमधील संघर्ष टळला असे वाटत असतानाच भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते अचानक भिडल्याने शिवसेना भवन परिसरात तणाव निर्माण झाला. या वेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांचीही धरपकड केली.

भाजप युवा मोर्चाचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली या फटकार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिर भूखंड घोटाळ्यावरून शिवसेनेने केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून युवा मोर्चाने आंदोलन पुकारले होते. भाजपच्या युवा मोर्चाचा मोर्चा शिवसेना भवनावर येणार असल्याची कुणकुण लागताच शिवसेनेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक शिवसेना भवनासमोर जमले. जशास तसे उत्तर देण्याच्या इराद्यानेच शिवसैनिक शिवसेना भवनासमोर जमले होते. त्यामुळे दोन्ही पक्षात मोठी धुमश्‍चक्री उडण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शिवसेना भवनासमोर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शिवसेना भवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जवांनाही या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. या वेळी ’सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले. दरम्यान, पोलिसांची व्हॅन या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. आंदोलकांना पकडण्यासाठी शिवसैनिक धावले होते; मात्र व्हॅन सुसाट गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाती लागले नाहीत. मोर्चा संपला असे वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारले, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

COMMENTS