Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सडा वाघापूरजवळ अल्टो कार तीनशे फूट दरीत कोसळली : एकजण जखमी

पाटण : पाटण-सडावाघापूर रस्त्यावर म्हावशी गुजरवाडी येथे दरीत कोसळलेल्या अल्टो कारची पाहणी करताना पोलीस कर्मचारी. पाटण / प्रतिनिधी : पाटण शहरापासू

मसूर-वडूज-पुसेसावळीतील दरोडा उघडकीस आणण्यात यश
बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट
महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा

पाटण / प्रतिनिधी : पाटण शहरापासून काही अंतरावर असलेल्या म्हावशी, गुजरवाडी, सडावाघापूर रस्त्यावर घाटात टेबल लँड परिसरात मारुती अल्टो वाहन तीनशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शहाजी व्यंकट भिसे (वय 45 रा. नवारस्ता, ता. पाटण) हे जखमी झाले आहेत. अपघातातील वाहनाचा पूर्ण चक्काचूर झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास शहाजी भिसे हे आपल्या कामासाठी सडा वाघापूरच्या रस्त्याने निघाले होते. त्यांच्याकडे मारुती अल्टो हे वाहन होते. ते स्वतः गाडी चालवत होते. दरम्यान, अचानक त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने अल्टो कार बाजूला असलेल्या दरीत खोलवर जवळपास 300 फूट खाली कोसळली. यात शहाजी भिसे हे जखमी झाले तर पलट्या खात गाडी खोल दरीत पडल्याने वाहनाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळतात तात्काळ स्थानिक नागरिक व पाटण घटनास्थळी पोहोचले. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने शहाजी भिसे यांना दरीतून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून कराड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. यामध्ये गाडीचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे.

COMMENTS