Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनगर आरक्षणप्रश्‍नी राज्यस्तरावर हालचाली सुरु    

चोंडीत माजी मंत्री राम शिंदे यांची उपोषणस्थळी भेट

जामखेड ः धनगर आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडीमध्ये  सूरू असलेल्या उपोषणस्थळी माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी रविवारी 19 नोव्

बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर बांधव रस्त्यावर
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच
धनगर आरक्षण उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

जामखेड ः धनगर आरक्षण अंमलबजावणी मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने चौंडीमध्ये  सूरू असलेल्या उपोषणस्थळी माजी मंत्री आ.राम शिंदे यांनी रविवारी 19 नोव्हेंबर रोजी भेट देऊन विचारपूस केली. धनगर आरक्षण प्रश्‍नी शासनपातळीवर हालचाली सुरु आहे. सरकारची भूमिका याबाबत अनुकल असून लवकरच ठोस निर्णय होण्याचे संकेत आमदार राम शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले.
दरम्यान धनगर आरक्षण अमलबजावणीची ठोस कार्यवाही  झाल्याशिवाय उपोषण थांबविणार नसल्याचा निर्धार यावेळी यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी व्यक्त केला. यासंदर्भात यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील म्हणाले, धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी, ही मागणी घेऊन यशवंत सेनेने दोन महिन्यापूर्वी तब्बल एकवीस दिवसांचे आमरण उपोषण केले.ते उपोषण थांबविताना महाराष्ट्र सरकारने 50 दिवसांत अंमलबजावणीसंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे लेखी आश्‍वासन दिले होते. मात्र या कालावधीत शासनाकडून काहीच कृती झाली नाही, त्यामुळे पुन्हा उपोषण करण्याची वेळ आली आहे. यावेळी उपोषणकर्ते यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश सरचिटणीस सुरेश बंडगर, प्रदेशाध्यक्ष प्रा. माणिकराव दांगडे पाटील, प्रदेश सचिव नितीन धायगुडे, प्रदेश मीडियाप्रमुख स्वप्निल मेमाणे समाधान पाटील, किरण धालपे, दत्ता काळे, संतोष कोल्हे, बाळा गायके, आदींसह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

COMMENTS