आग्रा प्रतिनिधी - संपूर्ण देश रंगीबेरंगी दिव्यांनी दीपोत्सवाचा उत्सव साजरा करत असताना, दोन सख्ख्या बहिणींनी आपले जीवन कायमचे संपवले आहे. या द
आग्रा प्रतिनिधी – संपूर्ण देश रंगीबेरंगी दिव्यांनी दीपोत्सवाचा उत्सव साजरा करत असताना, दोन सख्ख्या बहिणींनी आपले जीवन कायमचे संपवले आहे. या दोन सख्ख्या बहिणी आग्रा येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहत होत्या आणि येथेच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी या बहिणींनी तीन पानी सुसाइड नोट सोडली, ज्यामध्ये त्यांनी संस्थेच्या चार लोकांना त्यांच्या मृत्यूसाठी जबाबदार धरले आहे. एवढेच नाही तर आत्महत्या केलेल्या बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुसाईड नोटमध्ये त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या चार जणांना बापू आसारामप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आणि शिखा या दोघीही रक्ताच्या नात्यात असून, या बहिणींनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्मा कुमारीमध्ये दीक्षा घेतली होती. ब्रह्मा कुमारी झाल्यानंतर या दोन्ही मुलींच्या कुटुंबीयांनी आग्रा जगनेर येथे ब्रह्मा कुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये त्या दोघी राहत होत्या. मुलींच्या मृत्यूने कुटुंबीयही दु:खी झाले आहेत
COMMENTS