आत्महत्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

Homeताज्या बातम्यासंपादकीय

आत्महत्याचे वाढते प्रमाण चिंताजनक

जगभरात मनुष्य भौतिक सुखे प्राप्त करत असतांना, आजही तो समाधानी असल्याचे दिसून येत नाही. त्याचे मानसिक समाधान, आत्मिक समाधान, कुठेतरी हरवल्यामुळे तो आत

तरूण उद्योजकाची पत्नी अणि मुलासह आत्महत्या
चॉकलेट चोरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर तरुणीने केली आत्महत्या
भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या

जगभरात मनुष्य भौतिक सुखे प्राप्त करत असतांना, आजही तो समाधानी असल्याचे दिसून येत नाही. त्याचे मानसिक समाधान, आत्मिक समाधान, कुठेतरी हरवल्यामुळे तो आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबत असल्याचे चित्र वाढतमांना दिसून येत आहे. नुकताच ’नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो’च्या (एनसीआरबी) ताज्या अहवालातून आत्महत्या करणार्‍यांची आकडेवारी समोर आली असून, ती धक्कादायक आहे. देशभरात 2021 मध्ये तब्बल एक लाख 64 हजार 33 आत्महत्या झाल्या असून, आधीच्या वर्षीच्या तुलनेत त्यात 7.2 टक्के इतकी वाढ झाली आहे. देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. त्यानंतर तमिळनाडू आणि मध्य प्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण मोठे आहे. ही माहिती समोर आली आहे. 2021 या वर्षात सर्वांत जास्त आत्महत्यांच्या केसेस महाराष्ट्रात नोंदवण्यात आल्या. या वर्षभरात 1 लाख 64 हजार 33 आत्महत्या नोंदवण्यात आल्या होत्या, हा आकडा 2020पेक्षा 7.2 टक्क्यांनी वाढलेला होता.यापैकी सर्वाधिक म्हणजे 22,207 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या, त्यापाठोपाठ 14,965 आत्महत्या मध्य प्रदेशात तर 13,500 आत्महत्या पश्‍चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आल्या होत्या. आत्महत्या करणार्‍यांच्या संख्येतील 7.2 टक्केवारीची वाढ ही धक्कादायक आहे. मानसिक गुंता कसा सोडवायचा, अपयश आल्यास त्याला सामौरे कसे जायचे, या सर्व बाबींना सामौरे जाण्यासाठी प्रत्येक व्यक्ती सक्षम असायला हवा. मात्र भौतिक सुखाच्या आहारी जाणार्‍या मनुष्यजातीला मानसिक समस्यांना सामौरे जाता येत नसल्याचे दिसून येत आहे. खरं म्हणजे आपण आपली नवनिर्मिती सोडून दिली आहे. प्राचीन मनुष्य आणि आधुनिक मनुष्य यात मोठी तफावत आहे. प्राचीन मनुष्य आजचे जग उभारणीसाठी नव-नवीन कल्पना करत, त्यासाठी प्रयत्न करत होता. त्यातुनच त्याला चाकाचा शोध लागला, मग दळणवळणाची प्रक्रिया सुरु झाली. उघडयावर, गुहेत राहणारा मनुष्याला अग्नीचा शोध लागला, त्यानंतर त्यांने अन्न शिजवून खाण्यास सुरुवात केली. दररोज नवनवीन शोध लावत, त्याने आज सर्व जग अत्याधुनिक सोयी-सुविधांनी परिपुर्ण केले आहे. आपण त्या प्रत्येक गोष्टींचा उपभोग घेतांना दिसून येत आहे. त्यामुळे आपली क्रयशक्ती संपल्यागत जमा झाली आहे. आपल्याला काही माहिती हवी असेल, तर आपण गुगल करतो, प्रवासाचे नियोजन करायचे असेल तर गुगल, गुगल मॅप याचा वापर करून नियोजन करतो. थोडक्यात सांगायचे झाल्यास आपण नवनिर्मितीचा ध्यास घेत नाही. किंवा आहे त्या, अत्याधुनिक सोयी-सुविधांमध्ये आपण गुरफुटून गेलो आहे. कंटाळवाणे वाटले तर आपण आपला वेळ सिनेमा, मालिका बघण्यात घालतो. मात्र शारिरीक कष्ट करत नाही. थोडक्यात आपण आपली नवनिर्मितीची क्षमता गमावून तर बसलो नाही ना, हा प्रश्‍न निर्माण होतो. जगातील 85 टक्के लोक आपल्या दररोजच्या कामांव्यतिरिक्त स्वतःसाठी वेळच देत नसल्याचे समोर आले आहे. माणसानं स्वतःशी बोललं पाहिजे. काहीतरी नव-नवीन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र भौतिक सुखाच्या मागे धावणारा आजचा मनुष्य, जरासं काही मनासारखं घडलं नाही, तर तो आत्महत्या करतांना दिसून येत आहे. सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक समस्यांतून झाल्या आहेत. त्यांचे प्रमाण 33.2 टक्के आहे. नात्यातील गुंता कसा सोडवावा, याची उकल होत नाही. मात्र नाते टिकविणे ही एक कला आहे. आपण ज्या हाताने देतो, त्याच हाताने ते आपल्याकडे परत येते, असे म्हणतात. त्यामुळे आपण चांगलं काही देण्याचा प्रयत्न केला, तर चांगले ते आपल्याकडे परत येईल. यात शंका नाही. व्यवसाय व नोकरीतील अडचणी, एकटेपणाची जाणीव, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक आजार, दारूचे व्यसन, आर्थिक तोटा आणि तीव्र वेदना आदी प्रमुख कारणांमुळे आत्महत्येच्या घटना घडल्याचे समोर आले आहे.

COMMENTS