Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दौंड तालुक्यातील अपघातात दोन महिलांचा मृत्यू

पुणे सोलापूर महामार्गावर आराम बसचा भीषण अपघात

दौंड : पुणे सोलापूर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणार्‍या आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महिला प्रवाशांचा ज

ट्रकने दिलेल्या धडकेत शिवभक्ताचा मृत्यू
भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; २ तरुणांचा जागीच मृत्यू
मुंबईत बसने 13 जणांना चिरडले; चौघांचा मृत्यू, 9 जण गंभीर जखमी

दौंड : पुणे सोलापूर महामार्गाने लातुरहुन पुण्याकडे जाणार्‍या आराम बसचा दौंड तालुक्यातील पाटस येथे भीषण अपघात झाला. यामध्ये दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर तसेच तीस प्रवाशी जखमी झाले.गुरुवारी (ता.26) पहाटेच्या सुमारास आराम बस रस्त्याच्या बाजुला उभ्या असणाऱया सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला धडकल्याने हा भीषण अपघात झाला.सत्याभामा बोयने (वय 72) रा.शहाजा-निलंगणा (लातुर),श्‍वेता पंचाक्षरी रा.शहाजा-निलंगणा (जि.लातुर) अशी मयतांची नावे आहेत. तर बाळासाहेब शिरखाने रा. सोलापूर हे गंभीर जखमी आहेत.
याबाबत पाटस पोलिस चौकीचे फौजदार संजय नागरगोजे यांनी माहीती दिली. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गाने लातुरहुन एक आऱाम बस प्रवाशी घेवून पुण्याकडे जात होती. पहाटेच्या सुमारास दौंड तालुक्यातील पाटस घाटात रस्त्यात बंद पडलेल्या सिमेंट वाहतुकीच्या ट्रकला आराम बसची जोराची धडक बसली. अपघात इतका भिषण होता की बस भररस्त्यात उलटली. आराम बसच्या डावीकडील भागाचा पुरता चुराडा झाला. यावेळी दोन महीला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाले.

COMMENTS