Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रकने दिलेल्या धडकेत शिवभक्ताचा मृत्यू

वढू येथून परतताना असतांना अपघात

पुणे ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मासानिमित्त लोणी काळभोर परिसरातील तुळापूर येथून फलटण येथे शिवभक्तांचा एक समूह शिवज्योत घेऊन जात ह

चिखलदर्‍यात कार दरीत कोसळून चौघांचा मृत्यू
नऊ वर्षीय बालकाचा बसच्या धडकेत मृत्यू
धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू

पुणे ः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मासानिमित्त लोणी काळभोर परिसरातील तुळापूर येथून फलटण येथे शिवभक्तांचा एक समूह शिवज्योत घेऊन जात होता. थेऊर गावाच्या हद्दीत केसनंद परिसरात जाणार्‍या रस्त्यावर एका भरधाव वेगातील ट्रकने सदर शिवभक्तांना धडक दिल्याने एका 18 वर्षीय शिवभक्ताचा जागीच मृत्यू झाला, तर 3 शिवभक्त जखमी झाले. त्यातील एकाची परिस्थिती गंभीर आहे.
अथर्व संतोष हेंद्रे (वय -18, राहणार – फलटण, सातारा ) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर अनिकेत सुनील जगदाळे, प्रेम पोळ आणि विवेक तारोळकर (सर्व राहणार -फलटण ) हे या अपघातात जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालक संतोष शिवाजी नरळे ( रा. – बंडगर वस्ती, हबीसेवाडी, सोलापूर) याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आदित्य शंकरराव गायकवाड ( वय – 31, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा ) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार यांच्या गावातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान फलटण सामाजिक संघटनेतील अंदाजे 70 ते 80 जण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मासानिमित्त तुळापूर येथून फलटण येथे शिवज्योत घेऊन जात होते. त्यावेळी ट्रक चालक संतोष नरळे यांनी त्याच्या ताब्यातील ट्रक हा वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात हायगायीने चालवला. तक्रारदार यांच्या ज्योतच्या पाठीमागून येणार्‍या दुचाकींना भरधाव वेगात पाठीमागून ठोकर मारून गंभीर अपघात केला. त्यात 1 जण ठार, तर 3 जण जखमी झाले. यका घटनेत दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. याबाबत पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत. तसेच दुसर्‍या एका घटनेत दुचाकीवरील नियंत्रण सुटून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे शहरातीलच औंध रोड स्पायसर कॉलेजलगत घडली आहे. मनीष अभय कुमार जेना (वय -31 ,राहणार -हिंजवडी ,पुणे ) असे मृत तरुणाचे नाव आहे. मनीष आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने चालवत होते. रस्त्यात त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची गाडी फुटपाथवर चढली. या दुर्घटनेत मनीषच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्याच्या विरोधात चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई लहू भागचंद धस यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.

COMMENTS