Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तरूणाची आत्महत्या

बीड ः जिल्ह्यातील शहाजानपूर लोणी गावात एका 21 वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आ

भारताचा विश्वचषकात पराभव झाल्यामुळे तरुणाची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं आयुष्य
सासरच्या छळाला कंटाळून कर्जतमध्ये विवाहितेची आत्महत्या

बीड ः जिल्ह्यातील शहाजानपूर लोणी गावात एका 21 वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या का करत आहोत, याचे कारण त्याने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. अशोक मते, याने स्वतःच्या शेतात आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, याच्याविरोधात आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यामूळे मराठा आरक्षणामुळे ही आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

COMMENTS