Homeताज्या बातम्यादेश

फ्रिज उघडताना 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

तेलंगणा प्रतिनिधी - तेलंगणा राज्यात एका सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अभिवादन
परीटवाडीमधील सौरप्रकल्पामुळे वृक्षतोड
कॉंग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आल्यास झोडून काढू | LOKNews24

तेलंगणा प्रतिनिधी – तेलंगणा राज्यात एका सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ तालुक्यात सोमवारी ही दुःखद घटना घडली. ही संपूर्ण घटना सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही मुलगी आपल्या वडिलांसोबत सुपरमार्केटमध्ये गेली होती. वडील फ्रीजमध्ये आईस्क्रीम शोधत असताना मुलगी चॉकलेट घेण्यासाठी शेजारील फ्रिजकडे गेली. या फ्रीजच्या दरवाजाला स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला. वडिलांनी ताबडतोब मुलीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. आता मुलीच्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह घेऊन सुपरमार्केटसमोर निदर्शने केली आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

COMMENTS