Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरमध्ये जवानाचे अपहरण करून हत्या

इम्फाळ/वृत्तसंस्था ः आरक्षणाच्या प्रश्‍नावरून ईशान्येकडील मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असतांना, जमावाने भारतीय सैन्यातील एका जवानाची हत्या केल्या

अधिवेशनात 8 हजार 609 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर
Ahmednagar मध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा… ‘या’ हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाना | Sex Racket (Video)
वाडा हॉटेलपासून पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंत वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती

इम्फाळ/वृत्तसंस्था ः आरक्षणाच्या प्रश्‍नावरून ईशान्येकडील मणिपूर राज्यात हिंसाचार सुरू असतांना, जमावाने भारतीय सैन्यातील एका जवानाची हत्या केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात संबंधित जवानाचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे आता या घटनेवरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सीपॉय सेर्तो थांगथाँग कोम असे मृत जवानाचे नाव असून त्याच्या हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये राहणारे भारतीय सैन्याचे जवान सीपॉय सेर्तो थांगथाँग कोम यांचे काही दिवसांपूर्वी जमावाकडून अपहरण करण्यात आले होते. सुट्टीनिमित्त ते घरी आले असता काही लोकांनी त्यांना घरातून उचलून नेले होते. लिमाखोंग लष्करी स्टेशनवरून परतल्यानंतर त्यांच्या मुलासमोर आरोपींनी त्यांना गाडीत घालून अज्ञातस्थळी नेले होते. परंतु रविवारी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपींच्या अटेकची कार्यवाही सुरू केली आहे. या प्रकरणातील आरोपी फरार असून सीसीटीव्ही फूटेजच्या आधारावर त्यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

COMMENTS