अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल आठ मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचू
अहमदनगर/प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल आठ मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्या गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शिताफीने पकडले. या कारवाईत चौघांना पकडून त्यांच्या कडील साठ हजार रुपये व दानपेट्या फोडण्याचे साहित्य जप्त केले. ही कारवाई नगर सोलापूर रोडवरील बंद पडलेल्या टोल नाक्यावर केली. या टोळीने नगर जिल्ह्यातील राहुरी, कोपरगाव, श्रीरामपुर, जालना, व भिंगार अश्या वेगवेगळ्या तालुक्यात मंदिरातील दानपेट्या फोडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील रेणुका माता मंदिराचे दरवाजाचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील 16 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरीस गेले होते. या प्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. दरम्यान जिल्ह्यातील मंदिरांच्या दानपेट्या फोडणारी सराईत गुन्हेगारांची टोळी ही नगर सोलापूर रोडवरील बंद पडलेल्या टोलनाक्यांवर येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी टोलनाक्याजवळ सापळा लावला. पोलिसांनी लावलेल्या सापळ्यात धनंजय काळे, भगवान परदेशी, अमोल पारे, राहुल लोदवाल हें सापडले असता त्यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात तब्बल 8 मंदिरात चोरी केल्याचे निष्पन्न झालें आहे. त्यांच्याकडुन पोलिसांनी रोख रक्कम साठ हजार रुपये व दानपेटी फोडण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता या आरोपींनी फ़क्त आठ ठिकाणीच नव्हे तर याआधी देखील अनेक ठिकाणी मंदिरातील दानपेट्या फोडल्याचे समोर आले आहे. या अटक केलेल्या आरोपीमधील प्रकाश काळे याच्यावर आठ तर, अमोल पारे याच्यावर तब्बल चौदा गुन्हे दाखल असून चौघां आरोपींवर तब्बल एकतीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
COMMENTS