Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सारखानी येथे विनापरवाना 1 मिनिटांची ऑनलाइन लॉटरीचे दोन दुकान बिनधास्तपने सुरू

माहूर - सिंदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत सारखानी ये गाव येत असून येथे दररोज ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली लाखोंरुपयांची लूट होत आहे. एकमिंनिटाच्या या खेळ

संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
संविधानाने दिलेला अधिकार बजावण्यासाठी आलोय – राज्यपाल
तरुणाचा दरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न | LOK News 24

माहूर – सिंदखेड पोलीस ठाण्याअंतर्गत सारखानी ये गाव येत असून येथे दररोज ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली लाखोंरुपयांची लूट होत आहे. एकमिंनिटाच्या या खेळावर लाखोंरुपयांची उलाढाल होताना दिसत आहे परंतु पोलीस प्रशासन बागायची भूमिका बजावत आहे.
सारखानी हे अवैध धंद्याचे माहेरघर तर बनलेले असून येथे खुलेआम मटका, जुगार,चंगड, सुरू आहे.आतातर ऑनलाइन लॉटरी च्या नावाखाली खुलेआम गोरगरीब जनतेची लूट सुरू आहे. सारखानी येथे अवैध धंदेवाले मोठ मोठे अड्डे थाटून बसले आहे.सारखानी येथील पोलीस चौकी पासून अवघ्या  जवळच मागील कित्तेक दिवसापासून हा अवैध धंद्याचा अड्डा भरविण्यात येत असताना पोलिसांना हा अड्डा दिसत नाही याचा आश्चर्य आहे. सदरक्षणाचा प्रकाश देणार्‍या पोलीस चौकीच्या दिव्याखालीच हा अंधार असल्यामुळे सारखणी येथे कायदा व सुव्यवस्था कशी असेल याचा अंदाज येतो हा अवैध मटका जुगार ऑनलाईन लॉटरी बंद करण्यात यावी अशी मागणी परिसरातील व गावातील नागरिक करत आहे. परंतु पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने  अवैद्य धंदे सारखनी येथे खुलेआम सुरूअसल्याचा आरोप नागरिकाकडून होत आहे.

COMMENTS