Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोहा शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग बनला चिखलमय पांदण रस्ताखड्ड्यामुळे नागरिक त्रस्त

रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी

लोहा प्रतिनिधी - लोहा शहरातुन जाणारा 361 राष्ट्रीय महामार्ग मागिल दोन वर्षापासून खड्डेमय झाला असुन, पादचारी, दुचाकी मोठ्या वाहन चालकासह आपला जीव

शरद पवारांचं आडनाव बदलून ‘आगलावे’ करा
जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलला दुहेरी मुकुट
ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

लोहा प्रतिनिधी – लोहा शहरातुन जाणारा 361 राष्ट्रीय महामार्ग मागिल दोन वर्षापासून खड्डेमय झाला असुन, पादचारी, दुचाकी मोठ्या वाहन चालकासह आपला जीव मुठीत घेऊन शहरातुन मार्गक्रमण करावा लागत आहे, खड्ड्यांमुळे महामार्गाला पांदन रस्त्याचे स्वरुप आले आहे पाऊस झाला की,चिखलमय सदा सर्वदा धुळीचे लोट होत आसल्याने संबधीत गुत्तेदार व शासकिय यंत्रणेच्या व लोकप्रतिधिच्या प्रतापा मुळे खड्ड्यात गेला रस्ता म्हणन्याची वेळ लोह्याच्या नागरीकांना आली आहे.
मागिल दोन वर्षा पुर्वी नांदेड लातुर राष्ट्रीय महामार्गाच्या कामास सुरवात झाली,लवकरच शहरातुन जाणारा रस्ता सुंदर होण्याची आशा होती परंतु दुरुतीच्या नावाखाली वारंवार गिट्टी व मुरुम टाकुन शहरात प्रचंड धुळीचे साम्राज निर्माण केले जात आहे तर थोडा ही पाऊस झाला की चिखलमय पांदन रस्त्याचे स्वरुप येत असुन, पुर्णपणे खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावर मुरुम, गिट्टी, दगडाची चुरी टाकल्याने अनेकजण गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या असतानाही कोणतीच शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, संबंधीत गुत्तेदार जीव ओतुन काम केल्याचे दिसुन आले नाहीत खड्ड्यांमुळे व धुळीमुळे पाऊस झाल्यास चिखलाने मेटाकुटीस आलेल्या शहर वासीयांची सुटका कधी होणार ही एक चिंतनाचीच बाब आहे. मागिल तिनं वर्षापासुन शिवसेना पदाधिकार्‍यानी नांदेड येथील महामार्ग प्राधिकरण कार्यालयास घेराव घातला असता थातुर मातुर डांबरीकरण करण केले नंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फुल बरसावो आंदोलन केली.असे अनेक संघटनांनी आंदोलने केली परंतु संबंधीत गुत्तेदारच्या वतीने महामार्गाच्या दुरुस्तीच्या नावखाली शासणाची लाखोंची लुट करत  थातुर मातुर डागडूजी केली परिणामी पुन्हा काही दिवसात रस्त्यांची तीच परिस्थिती, तालुक्यातील संबंधीत महामार्ग प्राधिकरणाने व लोकप्रतिनिधींनी लक्ष देवून नागरिकांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी जनतेतुन होत आहे.

COMMENTS