Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमआयडीसीत झाडे तोडणार्‍या कंपनी मालकासह दोघांविरोधात गुन्हा

पुणे ः विनापरवाना आठ झाडे तोडणार्‍या कंपनी मालकासह ठेकेदाराविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडे घेऊन जाणारा ट्

बीड जिल्ह्यात डेंग्यूने घेतला चिमुकलीचा बळी
पत्रकारांबाबतीत बावनकुळे यांचे वक्तव्य वैफल्यातूनच : प्रा सदानंद माळी  
श्रीक्षेत्र वाहिरा येथे भव्य 101 फूट उंच श्वेतध्वज भूमीपुजन सोहळा

पुणे ः विनापरवाना आठ झाडे तोडणार्‍या कंपनी मालकासह ठेकेदाराविरोधात भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाकडे घेऊन जाणारा ट्रकही महापालिकेने ताब्यात घेतला. ही कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. सुरेश जे बजाज, राजेंद्र बाबू मांजरे (रा.बौद्धनगर, निगडी) यांच्याविरोधात महाराष्ट्र झाडे तोडणे, झाडांचे संरक्षण व जतन या अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महापालिकेचे उद्यान सहाय्यक सुहास एकनाथ सामसे (वय 47, रा.उद्यमनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसी येथील एफ-दोन ब्लॉकमध्ये विनापरवाना झाडे तोडले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उद्यान विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कंपनीतील आणि फुटपाथवरील महापालिका मालकीची आठ झाडे तोडल्याचे निदर्शनास आले. त्यात मोहोगणीची चार, कांचन, कोशिया, रेन्ट्री आणि आंब्याचे प्रत्येकी एक झाड जमिनीपासून तोडले. ती लाकडे टेम्पोमध्ये भरली होती. कंपनी मालक बजाज यांनी झाडे तोडण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. ठेकेदार मांजरे याने कंपनी मालक बजाज यांनी बेकायदेशीररित्या झाडे तोडण्यास सांगितल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

COMMENTS