Homeताज्या बातम्यादेश

भाजप घराणेशाहीला लावणार चाप

लोकसभेसाठी फिरवणार भाकरी अनेकांची उमेदवारी धोक्यात

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून, त्यादृष्टीने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपने विविध राज्यांतील जाग

दुर्दैवी ! तीन जिवलग मित्रांचा मृत्यू
ओंद्रिया आरासू!
राज्याला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार ?

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली असून, त्यादृष्टीने रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. भाजपने विविध राज्यांतील जागांवर विजय मिळवण्यासाठी रणनीती आखत आगामी निवडणुकीत घराणेशाहीला चाप लावण्याचे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांच्या मुलांना लोकसभेसाठी मुकावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने या निवडणुकीसाठी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, खासदार भाजप अध्यक्ष व्हीडी शर्मा, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांच्यासह भाजपचे अनेक वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तापायला सुरूवात झाली असतांनाच, भाजपने भाजपने ’मास्टरप्लान’ तयार केल्याचे समोर येत आहे. घराणेशाहीवरून काँग्रेसला सातत्याने घेरणारा सत्ताधारी पक्ष भाजपमध्येही काही बदल करेल, असे संकेत भाजपच्या नवी दिल्लीतील बैठकीतून मिळत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका आणि आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे बोलले जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचा ’मास्टरप्लान’ तयार असल्याचे सांगितले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपनं रणनीती आखल्याचे सांगितले जाते. भाजपमधील घराणेशाहीला पंतप्रधान मोदी चाप लावणार असल्याचे सांगितले जाते. तसे संकेतही कालच्या बैठकीतून देण्यात आले आहेत. भाजपच्या सर्वच नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिली जाणार नाही. त्याऐवजी महिला आणि युवकांना संधी देण्याचा मानस आहे, असे सांगितले जाते. सध्या मंत्रिमंडळात असलेल्या काही मंत्र्यांचेही आगामी निवडणुकीत तिकीट कापणार असून, नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पुढील निवडणुकीत नव्या चेहर्‍यांना संधी देण्याबद्दल बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जाते. गेल्या काही दिवसांपासून स्वतः नरेंद्र मोदी हे घराणेशाहीवरून विरोधकांना लक्ष्य करताना दिसत आहेत. तर विरोधकांनीही भाजपमधील घराणेशाहीवर टीका करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे आता भाजपमधील घराणेशाहीला चाप लावण्याचा विचार केला जाणार आहे, असे सूत्रांकडून समजते. ज्या उमेदवारांमध्ये निवडून येण्याची क्षमता आहे. ज्यांची समाजाशी घट्ट नाळ जोडलेली आहे, अशाच काही ठराविक चेहर्‍यांना पुन्हा संधी मिळू शकते. पण जास्तीत जास्त नव्या चेहर्‍यांना संधी कशी द्यायची, याबाबतचा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून केला जात आहे. सध्या मंत्रिमंडळात भाजपचे असे काही चेहरे आहेत की त्यांच्या कामाचा अहवाल नकारात्मक आल्याचे कळते. त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही, असे भाजपने निश्‍चित केल्याचे सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत संबंधित मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो. तशी यादीही सर्वेक्षणातून समोर आल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगितले जात आहे.

कमकुवत जागांवर लक्ष देण्याची पंतप्रधान मोदींची सूचना – भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक बुधवारी रात्री उशिरापर्यंत नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात सुरू होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी एमपीच्या नेत्यांना कमकुवत जागांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. दुसरीकडे, छत्तीसगडमधील 90 पैकी 27 विधानसभा जागांवर उमेदवारांच्या पॅनलबाबत दोन तास चर्चा झाली. या वर्षाच्या अखेरीस मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये निवडणुका होणार आहेत. यापैकी फक्त मध्यप्रदेशात भाजपची सत्ता आहे. सध्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या चेहर्‍यावर मध्यप्रदेशची निवडणूक लढवली जाणार आहे. बैठकीत मध्य प्रदेशबाबत सुमारे दीड तास चर्चा झाली. प्रदेश नेत्यांनी जमिनीच्या पातळीवर सुरू असलेल्या कामांची माहिती दिली.

COMMENTS