Homeताज्या बातम्यादेश

चहा प्यायल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

भोपाळ : चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झा

डायल 112 वर खोटी माहिती देणे भोवले : फोन करणार्‍या आरोपीविरुद्घ गुन्हा नोंद | LOK News 24
बंधाऱ्याचे पाणी शेतीमध्ये, शेतातील माती नदीमध्ये
राम नवमी निमित्त आयोजित प्रभू श्रीराम यांची जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या हस्ते आरतीचे आयोजन 

भोपाळ : चहा प्यायल्याने एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशच्या देवासमध्ये घडली आहे. चहा प्यायल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा त्याच्या आई केला आहे. मुलाला चहा प्यायल्यानंतर श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. सिमरोल पोलिसांनी सांगितले की, लहान मुलाचे वडील तुरुंगात असल्याने तो आपल्या आजोबांच्या घरी होता. मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, चहा दिल्यानंतरच मुलाला अस्वस्थ वाटू लागले. प्रकृती बिघडल्याने त्यांनी त्याला इंदूरच्या चाचा नेहरू रुग्णालयात नेले. मात्र वाटेतच मुलाचा मृत्यू झाला.

COMMENTS