Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दांडेघर येथील डोंगराला मोठ-मोठ्या भेगा; शाळेच्या इमारतीला धोका

पांचगणी / वार्ताहर : दांडेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठ-मोठ्या भेगा पडल्याने या ठिकाणी असणार्‍य

माण तालुक्यात अवैध वाळू उपसा; 17 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त
कृष्णा पूलावरून नदीत उडी घेत युवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
बीआरएस भाजपची बी टीम : आ. पृथ्वीराज चव्हाण

पांचगणी / वार्ताहर : दांडेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील ब्लूमिंग डेल हायस्कूलचे वरच्या बाजूच्या डोंगराला मोठ-मोठ्या भेगा पडल्याने या ठिकाणी असणार्‍या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आज सायंकाळी महसूल विभागाने पंचनामा केला असून त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्थलांतर करावे, असे आदेश तातडीने दिले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पांचगणीपासून केवळ एक किलोमीटर अंतरावर असणार्‍या दांडेघर हद्दीत असणार्‍या ब्लुमिंग डेल हायस्कूल इमारतीच्या वरच्या बाजूला असणारा सर्व्हे नंबर 23/6 हा डोंगर आज अतिवृष्टीने सुमारे अडीच फूट खाली खचला. डोंगराला सुमारे अर्धा ते एक फुटाच्या भेगा पडल्याने या शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला आहे. आज सायंकाळी तलाठी दीपक पाटील, निलेश गीते व उपसरपंच जनार्दन कळंबे, अशोक कासूर्डे यांचे उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. यावेळी येथील परिस्थीतीची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी धोकादायक क्षेत्रात असणार्‍या शाळेच्या इमारतीला धोका असल्याने अधिकार्‍यांनी शाळेतील मुलांना तातडीने इतरत्र हलविण्याचे आदेश दिले आहेत. सध्या पांचगणी परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जमीन खचण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आज दांडेघर येथील डोंगर पावसाने खचला असल्याचे उपसरपंच जनार्दन कळंबे यांच्या निदर्शनास आल्याने आज सर्वांना बोलावून पंचनामा केला आहे. या भेगांमुळे शाळेच्या लागत असणारी दरड पाण्याच्या टाक्याजवळ आली आहे. तर एक वृक्षही यामध्ये उन्मळून पडला आहे.

COMMENTS