सोलापूर : सोलापुरातील सांगोला येथे एका पोलिस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिस उपनिरीक्षक रात्री जेवणानंतर शतवाली करण्या
सोलापूर : सोलापुरातील सांगोला येथे एका पोलिस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. पोलिस उपनिरीक्षक रात्री जेवणानंतर शतवाली करण्यासाठी गेले असताना काही अज्ञातांनी त्यांच्या पाठीमागून जाऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह रस्त्यावर पडलेला अवस्थेत आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. एका पोलिस अधिकार्याच्या हत्येमुळे सोलापूर पोलिस दलात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज विष्णू चंदनशिवे (वय, 42) असे हत्या झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील वासूद- केदारवाडी येथे वास्तव्यास होते. ते बुधवारी रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराजवळ केदारवाडी रोडवर गेले. मात्र, या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकर्यांनी पाठीमागून जाऊन त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री शतपावली करण्यासाठी गेलेले चंदनशिवे दिवस उजडला तरी घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी चंदनशिवे यांचा मृतदेह वासूद- केदारवाडी रोडनजीक आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचानामा केला. चंदनशिवे यांचा मृतदेह सांगोला सांगोला ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी दाखल करण्यात आले आहे. चंदनशिवे यांच्या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. चंदनशिवे हे भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वारणानगर येथे 2018 साली एका चोरीच्या प्रकरणात चंदनशिवे यांचे नाव समोर आले होते. यामुळे त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते. एका वर्षापूर्वी हे निलंबन रद्द करून सांगली मुख्यलायत ते रुजू झाले होते. गेल्या दोन महिन्यापूर्वी चंदनशिवे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले.
COMMENTS