जळगाव - जळगावतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षका
जळगाव – जळगावतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. संबंधित घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी जात असलेल्या पोलिसांच्या गाडीवर काळाने घाला घातला. जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ झाड कोसळलं. गुरुवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास ही घटना घडली. त्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस विभागात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस विभागाची गाडी 5 जणांच्या पथकासह एका गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्यासाठी कासोदाकडे जात होते. यावेळी पावणे दहाच्या सुमारास अचानक त्यांच्या गाडीवर मोठं झाड कोसळलं. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि चालकाचा मृत्यू झाला. तर गाडीमधील इतर 3 कर्मचारीदेखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. या अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर आणि चालक अजय चौधरी हे दोन्ही जागेवरच ठार झाले आहेत. तर चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणाच्या तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
COMMENTS